स्थानिकांच्या रोजगारावरून शिवसेना आक्रमक कॅलिबर मर्कटाईल प्रायव्हेट लिमिटेड च्या व्यवस्थापकाला निवेदन.

स्थानिकांच्या रोजगारावरून शिवसेना आक्रमक 

कॅलिबर मर्कटाईल प्रायव्हेट लिमिटेड च्या व्यवस्थापकाला निवेदन. 

परराज्यातील कामगारांची पोलीस तपासणी करावी

माजरी
चेतन लुतडे 

मागील आठ महिन्यापासून माजरी येथील बेरोजगार युवक नोकरीच्या शोधात आहे. मात्र स्थानिक कंपन्यांमध्ये युवकांना डावल्याने कंपनी आणि बेरोजगार युवक यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. 
शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांच्या नेतृत्वात माजरी येथे न्यू माजरी एरिया येथील कॅलिबर मर्कटाइल प्रायव्हेट लिमिटेड च्या व्यवस्थापकाला स्थानिक रोजगाराबद्दल निवेदन सादर करण्यात आले. यावेळी मांजरी येथील बेरोजगार युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
सदर कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात परराज्यातील कामगार काम करत असून स्थानिकांनी वारंवार निवेदन देऊन सुद्धा अजून पर्यंत कोणताही रोजगार मिळायला नसल्याची खंत युवकांनी जिल्हाप्रमुखांकडे सादर केली. ही कंपनी माती व कोळसा उत्खनन करीत असून या संदर्भातील ड्रायव्हर, हेल्पर सुपरवायझर ,मिस्त्री कामांसाठी रोजगार दिला जातो. कंपनी डब्ल्यूसीएल मार्फत काम करीत आहे. मात्र डब्लू सी एल ने बेरोजगारीच्या या प्रश्नावर बोलणे टाळले असून थर्ड पार्टी काम करीत असणाऱ्या कॅलिबर मर्कटाईल कंपनीला अभय दिले आहे. या कंपनीमध्ये 80 टक्के लोक परराज्यातील असून यांच्यासाठी खास व्यवस्था करण्यात आलेली आहे. या कामगारांची पोलीस तपासणी करण्याची मागणी करीत कंपनीजवळ परराज्यातील कामगारांचा खरा आकडा बाहेर द्यावा. अन्यथा माजरी येथील युवक या कामगारांना शिवसेना स्टाईल धडा शिकवणार असा इशारा दिलेला आहे.
या परिसरातील कूचना ,पाटाळा, परसगांव या क्षेत्रातील बऱ्याच युवकांना स्थानिक रोजगारापासून मुकावे लागले आहे. येत्या काही दिवसात रोजगारी संबंधाचा प्रश्न न मिटवल्यास भव्य आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.

यावेळी नितीन मते शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्या सोबत मदन बाबू चिकवा, तबरेज शाहिद सिद्दिकी, विकास बाबू परचाके, संध्याताई ,रियाज शेख सरफराज हुसेन आदी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Comments