कोल वेतन वाढीसाठी कामगार केपीसीएल खान पाडणार बंद**खान कामगार करणार कुटुंबासह खान क्षेत्रामध्ये काम बंद हडताल*
*खान कामगार करणार कुटुंबासह खान क्षेत्रामध्ये काम बंद हडताल*
अतुल कोल्हे भद्रावती :-
कर्नाटक ऐम्टा कामगारांचे गेल्या चार वर्षापासून केपीसीएल खाणीचे व्यवस्थापन व त्याची सहयोगी बरांज कोल माईन्स हे शोषण करत असून वेतन वाढीच्या निवड भूल-थापा देत आहे. मात्र अजूनही कोल वेतनात एकही रुपयाची वाढ केली नाही त्यामुळे इतर मागण्या घेऊन कामगारांनी दिनांक ३ ऑक्टोंबर पासून केपीसीएल कोळसा खाणीचे उत्पादन बंद करून खान बंद करण्याचा इशारा पत्रकार परिषदेत दिला आहे.
कर्नाटक एम्टा खान कामगारांना वेज बोर्ड लावण्यात यावा कामगारांना सेफ्टी शूज, रेष शेल्टर , सेफ्टी गॉगल , पिण्यासाठी शुद्ध पाणी , मुलांसाठी स्कूल बस , २४ तास कामगारांसाठी उपचार केंद्र, वार्षिक बोनस , घर किराया या इतर मागण्यासाठी गेल्या चार वर्षापासून कामगार लढा देत आहे. या मागण्यासाठी चार वर्षात केपीसीएल कंपनी सोबत चाळीस बैठका झाल्या मात्र त्या विफल ठरल्या. या मागण्यासाठी कामगारांनी जेव्हा जेव्हा कंपनीच्या विरोधात आंदोलन केले तेव्हा कंपनी पोलीस बळाचा वापर करून लोकशाही पद्धतीने केलेले आंदोलन दडपण्यात आले. असाच प्रकार दहा दिवसांपूर्वी घडला अरविंद देवगडे या कामगारांनी वेज बोर्ड संदर्भात आंदोलन केले असता पोलिसांनी कॉलर पकडून आंदोलन स्थळापासून हटविल्याचा प्रकार घडल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.
या आंदोलनासंदर्भात जिल्हाधिकारी तसेच इतर प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून केपीसीएल कंपनीच्या विरोधात आम्ही सर्व खान कामगार कुटुंबासह खान क्षेत्रामध्ये काम बंद हडताल करणार आहोत . आंदोलनादरम्यान शांतता एवं सुव्यवस्था निर्माण झाल्यास याला पूर्णता संबंधीत शासन , प्रशासन , कंपनी जबाबदार राहील असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले या पत्र परिषदेला अरविंद देवगड , विनोद आगलावे, प्रदीप मानकर, सुभाष गेडाम, महेश पेटकर, पांडुरंग सातपुते अशोक ठेंगणे, शंकर बालपने , महेश तुंबडे, रवींद्र निखाड , विलास ताजने सह असंख्य कामगार उपस्थित होते.
Comments
Post a Comment