*विनयभंग प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा द्या: आदिवासी नेते रमेश मेश्राम**भद्रावतीत भव्य निषेध आक्रोश मोर्चा*

*विनयभंग प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा द्या: आदिवासी नेते रमेश मेश्राम*

*भद्रावतीत भव्य निषेध आक्रोश मोर्चा*

अतुल कोल्हे भद्रावती :-
                   राज्यात महिलांवरील लैंगिक अत्याचारात सारखी वाढ होत आहे.चंद्रपूर जिल्ह्यातही महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडलेल्या असून भद्रावती शहरात सात वर्षीय आदिवासी मुलीचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणात एका 37 वर्षीय आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीस कठोरात कठोर शिक्षा द्यावी व यापुढे अशा घटना घडणार नाही यासाठी कायद्यात कठोर शिक्षेची तरतूद करण्यात यावी यासाठी गोंडी धर्मी आदिवासी एकता संघटनेतर्फे शहरातील भद्रनाग  मंदिर प्रांगणातून एक भव्य आक्रोश निषेध मोर्चा काढून तहसीलदारांमार्फत  मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांना सादर करण्यात आले आहे. यावेळी  गोंडी धर्मीय  एकता संघटनेचे अध्यक्ष तथा आदिवासी नेते रमेश मेश्राम यांनी पीडित मुलीच्या शिक्षण व संगोपनाची तरतूद राज्य शासनाने करावी, पीडित मुलीच्या कुटुंबास आर्थिक सहाय्य द्यावे यासोबत अनेक मागण्या शासनापुढे  ठेवलेल्या आहेत.सदर आक्रोश निषेध मोर्चा शहरातील भद्रनाग  मंदिराच्या प्रिंगणातून निघून मुख्य रस्त्याने बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार असा होत तहसील कार्यालयात पोहोचल्यानंतर तिथे विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारा मार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांना पाठवण्यात आले. आपल्या अपयशावर पांघरून घालण्यासाठी पोलीस प्रशासन हे अत्याचाराच्या घटनांना वाचा फोडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप यावेळी आदिवासी नेते रमेश मेश्राम यांनी केला. यापुढे आदिवासीच नव्हे तर कोणत्याही समाजातील महिलांवर अत्याचार खपवून घेतला जाणार नाही, अशा घटना घडल्यास सर्व समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा यावेळी आदिवासी नेते रमेश मेश्राम यांनी दिला. सदर मोर्चात आदिवासी नेते रमेश मेश्राम, गोंदोला समुहाचे डा.प्रविण येरमे,महादेव सिडाम,संदीप नैताम,संदिप कुमरे,पिंटू मरसकोल्हे, अड.प्रमोद गेडाम,गोलू गेडाम,पिंटू मडावी,पुरब सिडाम,भास्कर तुमराम,संजय मसराम,सुरेश मडावी,निरंजन आत्राम, चिंतामन आत्राम, पत्रूजी आत्राम, पुष्पा मंगाम,वनीता परचाके, विद्या किनाके, अनीता गेडाम, शितल गेडाम, शुभांगी मेश्राम, सुनीता खंडाळकर, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे आदी ऊपस्थीत होते.

Comments