जय अंबे मंडळाचे अध्यक्ष आलेख रट्टे यांच्या संकल्पनेतून मातेच्या आरतीचा मान तृतीय पंथांना .

जय अंबे मंडळाचे अध्यक्ष आलेख रट्टे यांच्या संकल्पनेतून मातेच्या आरतीचा मान तृतीय पंथांना.

वरोरा 
चेतन लुतडे 
वरोरा शहरातील दुर्गा उत्सव मंडळातर्फे अनोखा पुढाकार घेऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्याचे उत्तम उदाहरण जय अबे शारदा उत्सव मंडळ वरोरा येथे पाहायला मिळाले. मंडळाचे अध्यक्ष आलेख रट्टे यांनी शारदा देवीच्या उत्सवातील आरतीचा मान तृतीयपंथांना देऊन एक अनोखी सामाजिक बांधिलकी जपली आहे. या पुढाकाराने समाजातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. रूढी परंपरा नुसार चालत आलेले नियमांना धरून युवकांनी नवीन परंपरा सुरू करावी ही बाब क्वचितच पाहायला मिळते. शहरातील प्रत्येक मंडळांनी एखादा समाज उपयोगी कार्यक्रम राबवल्यास निश्चितच समाजात चांगले परिणाम दिसून येतील. या नवीन परंपरेची सुरुवात झाली असून जय अंबे शारदा उत्सव मंडळाचे स्वागत करण्यात येत आहे.
 गेल्या 20 वर्ष पासून नवरात्री उत्सव साजरा करत आहे. आलेख रट्टे यांनी स्वतः मातीची छोटीशी शारदा देवीमूर्ती बसून सूरवात केली होती. त्यावेळी पासून हळू हळू समाज हिताचे कार्य मंडळ तर्फे करत येत आहे. त्याच बरोबर धार्मिक विधी सोबत संपूर्ण नवरात्री उत्सव साजरे करतात. सर्व धर्मीय समभाव आरतीचा कार्यक्रम राबवला जातो. त्यात सर्व धर्माचे लोक येऊन माॅ शारदादेवीची  महा आरती दरवर्षी करण्यात येते. या वर्षीचा मान तृतीयपंथीना देऊन समाज बांधिलकी जपली आहे.
यावीळी जय अंबे दुर्गा उत्सव मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेतर्फे  नरेंद्र जीवतोडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Comments