खांबाडा-नागरी रस्त्याने कोळसा वाहतूक करणारे ओव्हरलोड वाहतुक बंद करावी. शिवसेना तालुकाप्रमुख दत्ता बोरेकर

खांबाडा-नागरी रस्त्याने कोळसा वाहतूक करणारे  ओव्हरलोड वाहतुक बंद करावी. 
शिवसेना तालुकाप्रमुख दत्ता बोरेकर

वरोरा 
चेतन लुतडे 

वरोरा तालुक्यातील ओम साई कंपनी, उखर्डा या कंपनीला कोळसा पुरवठा करणारी वंदना ट्रान्सपोर्टची ओव्हरलोड वाहतुक उखर्डा-नागरी-खांबाडा या मार्गाने होत असुन कोळशाने ओव्हरलोड भरलेले ट्रक या मार्गावरुन धावत आहे. सदर रस्त्याची वाहतुक क्षमतेविषयी सार्वजनिक बांधकाम विभाग, वरोरा यांच्याकडुन माहिती घेतली असता सदर रस्ता हा IRC (Indian Road Congress)-37 च्या मार्गदर्शक सुचनेनुसार Standard Axle Load (Single Axle with Dual Wheel) नुसार 8 मेट्रीक टन इतक्या क्षमतेच्या वाहतुकीकरीता डीजाईन करण्यात आल्याचे कळते. परंतु सदर ट्रकांमध्ये 30 ते 40 मेट्रीक टन एवढा कोळसा भरुन वाहतुक होत असल्यामुळे या मार्गावर जागोजागी खड्डे पडलेले आहे. हा रस्ता अत्यंत खराब होत असुन या यामुळे सामान्य नागरीकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुकाप्रमुख दत्ता बोरेकर यांच्याकडे ग्रामस्थांची तक्रार प्राप्त झाली होती. 

या अनुषंगाने  सदर रस्त्यावरुन होणारी वाहतुक ताबडतोब बंद करावी जेनेकरुन सामान्य नागरीकांना त्रास सहन करावा लागणार नाही, सदर बाब हि अत्यंत गंभीर असुन यावर तात्काळ कार्यवाही करणे अपेक्षीत आहे. करीता सदर विषयाची तात्काळ कार्यवाही करण्या बाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्याकडे देण्यात आले आहे.

Comments