फक्त बातमी
मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को प्रदर्शन केंद्राच्या भव्य मैदानावर ग्राम प्रवर्तक रोजगार मेळाव्यामध्ये राज्यातील मोठ्या संख्येने उपस्थित ग्राम रोजगार सहाय्यक बंधू -भगिनींच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भव्य सन्मान करण्यात आला. राज्यातील रोजगार हमी योजना तळागाळापर्यंत पोहचवणाऱ्या ग्राम रोजगार सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल त्यांच्या वतीने सन्मानित करण्यात आला.
या निर्णयासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे यावेळी विशेष कौतुक केले. आज काहींनी त्यांच्यावर टीका केली असली तरीही मुलाशी लढण्याऐवजी बापाशी लढण्याची हिंमत ठेवा, असे सडेतोड प्रत्युत्तर दिले. दोन वर्षांपूर्वी आम्ही जो धाडसी निर्णय घेतला त्यामुळेच आज सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी धाडसी निर्णय घेणे आम्हाला शक्य होत असल्याचे निक्षून सांगताना हा मानधन वाढीचा निर्णय घेऊन १७ वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न सोडवल्याचे समाधान वाटत असल्याची भावना यावेळी व्यक्त केली. तसेच आजवर घेतलेल्या निर्णयामध्ये सर्वाधिक आनंद मिळवून देणारा निर्णय तुम्हा सर्वांसाठी घेतला असल्याचे यावेळी सांगत सरकारच्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवणारे योजनादूत तुम्ही बनावे अशी अपेक्षा यावेळी बोलताना व्यक्त केली.
राज्यातील महायुती सरकार नुसती आश्वासने देणारे नसून थेट कृती करणारे आपले सरकार आहे. जे देणे शक्य आहे ते तत्काळ देण्याची आमची भूमिका असते आणि त्यातूनच २८ हजार ग्राम रोजगार सेवकांना ८ हजार रुपये महिना आणि इन्सेन्टिव्ह असे वाढीव वेतन देण्याचा निर्णय घेतला असल्याचे यावेळी सांगितले. ' नो कमिटी, थेट डीबीटी ' अशी कामाची पद्धत असल्याचे सांगत मी देखील सर्वसामान्य कुटूंबातून आज या पदावर आलो असल्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या व्यथा आणि वेदनांची मला पूर्ण कल्पना असल्यानेच हा निर्णय घेतल्याचे यावेळी नमूद सांगितले.
राज्य सरकारने ' मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ' सुरू केली आहे. या योजनेत कुणी कितीही खोडा टाकण्याचा प्रयत्न केला तरीही ती बंद होणार नाही. उलट निवडणुकीपूर्वी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असा चौथा आणि पाचवा टप्पा एकत्र दिला जाईल, असे देखील यावेळी जाहीर केले. मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना, लेक लाडकी योजना, मुलींना मोफत शिक्षण योजना, वयोश्री आणि मुख्यमंत्री तीर्थ दर्शन या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचे काम आपण सर्वांनी करावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार रवींद्र वायकर, माजी खासदार राहुल शेवाळे, माजी खासदार हेमंत पाटील, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, गोपाळ लांडगे, प्रवक्ते राहुल लोंढे, नवीन गवळी, संदीप माने, अमोल बालकवडे, शिवसेना महिला आघाडीच्या सर्व महिला पदाधिकारी आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment