*समस्या निवारणासाठी भीम आर्मीचे नगरपरिषद कार्यालयात निवेदन*

*समस्या निवारणासाठी भीम आर्मीचे नगरपरिषद कार्यालयात निवेदन*

अतुल कोल्हे भद्रावती :-
                शहरातील सुमठाना भागातील रस्ते अत्यंत खराब झालेले असून रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास होत आहे. याच भागातील मनिहार लेआउट येथे रस्त्यावर वॉल कंपाऊंड बांधुन अतिक्रमण करण्यात आल्याने नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. याशिवाय शहरात अनेक समस्या निर्माण झाल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे नगर परिषदेने खराब झालेले रस्ते दुरुस्त करावे व याबरोबरच अन्य समस्या देखील मार्गी लावाव्या यासाठी भद्रावती तालुका भीम आर्मीच्या वतीने नगरपरिषद कार्यालयात मुख्याधिकारी विशाखा शेळकी यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी समस्यांबाबत मुख्याधिकाऱ्याशी चर्चा करण्यात आली.निवेदन सादर करताना भिम आर्मीचे राजरतन पेटकर, अतुल पाटील, थॉमस दुधे,रोशन पेटकर, सुरज बाराहाते, संकेत चिमूरकर आदी  पदाधिकारी उपस्थित होते.

Comments