*महायुती व महाविकास आघाडीत बंडखोरी होण्याची शक्यता.* *प्रमुख नेत्यांनी भरले अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज**भव्य रॅलीने गाजला आजचा दिवस*
*प्रमुख नेत्यांनी भरले अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज*
*भव्य रॅलीने गाजला आजचा दिवस*
वरोडा : श्याम ठेंगडी
महाराष्ट्र राज्य विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दोन दिवस शिल्लक असताना आज 28 ऑक्टोबर रोज सोमवारला वरोडा निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे १८ उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले. उमेदवारी अर्ज सादर करणाऱ्यात महाविकास आघाडी व महायुतीच्या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे हे विशेष. या नेत्यांनी अपक्ष म्हणून आपआपल्या पक्षाच्या उमेदवारांविरोधात हे अर्ज सादर केले आहेत.
महाविकास आघाडी तर्फे काँग्रेसच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचे बंधू प्रवीण काकडे यांना अधिकृत उमेदवारी मिळालेली असताना महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना उबाठा गटाचे झुंजार नेते मुकेश गजानन जीवतोडे यांनी भव्य शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच भाजपच्या अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष अहेतेश्याम अली यांनी पक्षाचा राजीनामा देत प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आलिशान सभागृहापासून निघालेल्या भव्य रॅलीत ते सहभागी झाले होते. जवळपास तीन किलोमीटरच्या या रॅलीत ते पायीच चालत निवडणूक कार्यालयात पोहोचले. त्यांच्या मिरवणुकीत पुरुष व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अमोल दिलीप बावणे व रंजना मनोहर पारशिवे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. तर शरद पवार गटाचे जयंत मोरेश्वर टेंभुर्डे यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याचप्रमाणे भाजपचे डॉक्टर रमेश महादेवराव राजूरकर व राजू गायकवाड यांनीही आपआपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
आज उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यात विनोद कवडूजी खोब्रागडे,अहेतेश्याम सदाकत अली, डॉ.रमेश राजूरकर, श्रीकृष्ण धुमदेव दडमल यांनी प्रत्येकी दोन-दोन अर्ज सादर केले.
उमेदवारी अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारात प्रवीण सुरेश काकडे (काँग्रेस),विनोद कवडूजी खोब्रागडे (अपक्ष), अमोल दिलीप बावणे (अपक्ष), राजू मारोती गायकवाड (अपक्ष), जयवंत नथुजी काकडे (अपक्ष), जयंत मोरेश्वर टेमूर्डे (अपक्ष), आहेतेश्याम सदाकत अली (प्रहार जनशक्ती), श्रीकृष्ण धूमदेव दडमल (अपक्ष), रंजना मनोहर पारशिवे (अपक्ष),करण संजय देवतळे (भाजपा), मुकेश मनोज जीवतोडे (शिवसेना उबाठा), मुकेश मनोज जीवतोडे (अपक्ष), चेतन गजानन खुटेमाटे (अपक्ष),महेश पंढरीनाथ ठेंगणे (अपक्ष), मुनेश्वर बापूराव बदकल (अपक्ष), डॉ.रमेश महादेवराव राजूरकर (अपक्ष), डॉ.रमेश महादेवराव राजुरकर (भाजपा) आदींचा समावेश आहे.
Comments
Post a Comment