*१० ऑक्टोबरला अमृततुल्य हितगुज व भव्य सत्संग मेळावा**श्रीस्वामी समर्थ सेवा केंद्र भद्रावतीचे आयोजन*

*१० ऑक्टोबरला अमृततुल्य हितगुज व भव्य सत्संग मेळावा*

*श्रीस्वामी समर्थ सेवा केंद्र भद्रावतीचे आयोजन*

अतुल कोल्हे भद्रावती : 
                श्रीस्वामी समर्थ सेवा केंद्र भद्रावतीचे वतीने वृंदावन सेलिब्रेशन हॉल, नवीन बस स्थानकासमोर गुरुवार दि.१० ऑक्टोबरला सकाळी १० वाजता आदरणीय चंद्रकांतदादा मोरे यांचे अमृततुल्य हितगुज व भव्य सत्संग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे .
परब्रम्ह भगवान श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने व परम- पुज्य गुरु माऊली यांनी विश्व कल्यानात्मक राष्ट्रीय उन्नतीसाठी अनेक यशस्वी अभियान राबविले आहेत.त्यांची अनुभूती सर्वच जन घेत आहे.
  त्यांच्या विश्वात्मक तळमळीतून अनेक कार्यक्रमांचे प्रगटीकरण झाले आहे. त्याच अनुशंगाने आयुर्वेद, अध्यात्म, वास्तुशास्त्र, स्वयंरोजगार, हस्तशास्त्र, ज्योतिष्य शासन,भारतीय अस्मिता,मानवाच्या विविध समस्या ईत्यादी सर्व मानवी जीवनाला परिपूर्ण करणाऱ्या बाबींवर श्रीचंद्रकांत दादा मोरे प्रबोधनात्मक हितगुज करणार आहेत. या सत्संग मेळाव्याचे मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजन समिती द्वारा करण्यात आले आहे.

Comments