*चंद्रपूर बसस्थानकाचे उर्वरीत काम त्वरीत करण्याचे कंत्राटदाराला निर्देश* *पाणी गळतीबाबत विभाग नियंत्रकाचे स्पष्टीकरण*

*चंद्रपूर बसस्थानकाचे उर्वरीत काम त्वरीत करण्याचे कंत्राटदाराला निर्देश*
 *पाणी गळतीबाबत विभाग नियंत्रकाचे स्पष्टीकरण*

अकूंश अवथे चंद्रपूर 

चंद्रपूर, दि. 9 : राज्य परिवहन महामंडळ, चंद्रपूर विभागामार्फत चंद्रपूरच्या बसस्थानकाचे सद्यास्थितीत बांधकाम प्रगतीपथावर आहे. प्रवाशी  वाहतुकीच्या दृष्टकिोनातून तळमजल्यावरील काही आस्थापना हस्तातंरीत करून प्रवाशी वाहतूक करण्यात येत आहे. इतर सर्व आस्थापना कंत्राटदाराकडून हस्तातंरीत होणे बाकी आहे. 
              राज्य परिवहन चंद्रपूर बसस्थानक मध्ये पावसाचे पाणी गळतीबाबत तात्कालिन विभागीय अभियंता यांनी पाहणी करून सर्व आवश्यक दुरुस्ती व उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत कंत्राटदाराला 3 ऑगस्ट 2024 रोजी कळविले आहे. सदर दुरुस्तीचे काम सुरू असतानाच आर.सी.सी.वॉल व टिन पत्रे यांना जोडणा-या भागापासून पाणी गळती होऊ नये, म्हणून पाणी गळतीरोधक प्रक्रिया करण्याकरिता सदर शीटवरील जोड खुला करण्यात आला होता. 8 ऑक्टोबर रोजी मुसळधार पाऊस आल्यामुळे पाणी गळती झाली. याबाबत कार्यकारी अभियंता,  रा.प. नागपूर यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट देऊन सदर कंत्राटदाराला दुरुस्तीचे काम तातडीने करण्याबाबत सुचना दिल्या आहेत, असे विभाग नियंत्रक राज्य परिवहन, चंद्रपूर यांनी कळविले आहे.
०००००

Comments