बकऱ्याची पार्टी जीवावर बेतली
एकाचा मृत्यू
चंद्रपूर
सध्या विधानसभा निवडणुकीची रंगत वाढत आहे. मतदारांना, कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी मटण, चिकन आणि दारू पार्टीची मोठयाप्रमाणात मेजवानी दिली जात आहे. ही मेजवानी मात्र वरोरा तालुक्यातील कार्यकर्त्यांना महागात पडली. एका राजकीय पक्षाने दिलेल्या पार्टीचा आनंद घेताना पार्टीच्या ठिकाणी असलेल्या विहिरीत पडून एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना वरोरा तालुक्यातील फत्तापूर येथे रविवारी रात्री 8 वाजताच्या दरम्यान घडली. गजानन काळे (52) रा पांझुर्णी असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार वरोरा तालुक्यातील फत्तापूर येथे प्रमोद मगरे यांच्या मालकीचे पीएचएम मेटल्स नावाने गिट्टी क्रेशर आहे. मगरे यांच्या क्रेशर परिसरात प्रशस्त जागा व पाण्याची व्यवस्था असल्याने मगरे यांच्याकडे मटण पार्टीचे नियोजन दिल्याचे समजते. या पार्टीत अंदाजे 400 ते 500 कार्यकर्ते मटणावर ताव मारण्यासाठी आले होते . दरम्यान या पार्टीत अरुण महल्ले (बंधली) आणि त्यांचे आतेभाऊ, पांझर्णी येथील ग्रामपंचायत सदस्य गजानन काळे आले होते. हे दोघेही मटणावर ताव मारत असताना पार्टी जवळ असलेल्या विहिरीकडे गेले . विहिरीवरील अर्धवट कठड्यावर तेबसले दरम्यान दोघांचाही विहिरीत तोल गेल्याने दोघेही विहिरीत पडले यातील अरुण महल्ले याला पोहता येत असल्याने तो विहिरी बाहेर निघाला मात्र गजानन काळे याला पोहता येत नसल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावेळी पार्टीत उपस्थित असलेल्या 500 जणापैकी एक ही यांच्या मदतीला धावून आले नाही. उलट साऱ्यांनीच घटना स्थळावरून पळ काढल्याचे बोलल्या जात आहे . मृतक . गजानन काळे यांचा मृतदेह सोमवारी सकाळी काढण्यात आला असून पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.
Comments
Post a Comment