सीसीआयची ऑनलाइन नोंदणी शेतकऱ्यांसाठी ठरली डोकेदुखी संतप्त शेतकऱ्यांचा सचिवाला घेराव .

सीसीआयची ऑनलाइन नोंदणी शेतकऱ्यांसाठी ठरली डोकेदुखी 

संतप्त शेतकऱ्यांचा सचिवाला घेराव 

सीसीआयचे सॉफ्टवेअर चालेना  : शेतकरी आक्रमक 

दोन दिवसापासून शेतकऱ्यांच्या बाजार समिती वर हेलपाट्या 

वरोरा 
       कृषी उत्पन्न बाजार समितीने सीसीआय ची कापूस खरेदी सुरु केली असून, त्यासंबंधी नोंदणी सुरू झाली आहे. या नोंदणीसाठी शेतकरी दोन दिवसापासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात चकरा मारत आहे मात्र  सीसीआयचे सॉफ्टवेअरच चालत नसल्याने दोन दिवसापासून शेतकऱ्यांच्या नोंदणी झाल्या नसल्याने संतप्त शेतकरी सचिवावर भडकले अखेर नोंदणी साठी आणखी संगणक वाढविणार असल्याचे सांगितल्याने शेतकऱ्यांनी नमते घेतले. 
       कापसाचे उत्पादन अत्यल्प . त्यात कापसाला भाव नाही आणि आता कापूस शासन दरबारी विकायचा असेल तर त्यासाठी शेतकऱ्याला ऑनलाइन नोंदणी सक्तीची करण्यात आली आहे. पूर्वी राज्य सरकार पणन महासंघाच्या माध्यमातून, तर केंद्र सरकार सीसीआयच्या माध्यमातून कापूस खरेदी करत होते. पणन आणि सीसीसाय यांच्यातील भावाच्या फरकाचा लाभ शेतकऱ्यांना होत होता. यात शेतकऱ्यांचा फायदा व्हायचा. 
परंतु, राज्य शासनाने पणनमार्फत खरेदी बंद केली तर सीसीआयने आता कापसाची आधार बेस खरेदी सुरू केली आहे. ही प्रणाली यावर्षी पहिल्यांदाच राबवली जात आहे. ओलावा आणि लांबी पाहून कापसाला दर मिळणार आहे. त्यात ऑनलाइन नोंदणीची नवीन अट टाकण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी सीसीआय केंद्रावर हमी दरावर कापूस विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. एवढे सोपस्कार पूर्ण केल्यावर शेतकऱ्याचा कापूस हा काट्यावर लावला जाईल व पाच ते सहा दिवसांनी पैसे खात्यात जमा होणार आहेत.
सीसीआयची ऑनलाइन नोंदणी शेतकऱ्यांसाठी ठरली डोकेदुखी 

संतप्त शेतकऱ्यांचा सचिवाला घेराव 

सीसीआयचे सॉफ्टवेअर चालेना : शेतकरी आक्रमक 

दोन दिवसापासून शेतकऱ्यांच्या बाजार समिती वर हेलपाट्या 

 खरेदी केंद्रात कापूस विक्रीसंबंधी शेतकऱ्यांना प्रथम खरेदी केंद्रात नोंदणी करून घ्यायची आहे. त्यासाठी आधार कार्ड, कापूस पीकपेऱ्याची नोंद असलेला सातबारा उतारा, बँक पासबुकची झेरॉक्स आणि इतर नावे असेल तर संमतीपत्र असे कागदपत्र आवश्यक असणार आहेत. नोंदणी झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याला कापूस विक्रीसाठी खरेदी केंद्रात मोबाइलद्वारे सूचना दिली जाईल. सीसीआयच्या खरेदी केंद्रात कापूस विक्रीसंबंधी शेतकऱ्यांना आधार, बँक खाते व मोबाइल लिंक करणे आवश्यक आहे. आधार व मोबाइल, बँक खाते लिंक असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कापूस विक्रीनंतर पाच दिवसांत परतावा किंवा मोबदला पाठविला जाईल.

सॉफ्टवेअर चे काम हैदराबाद कंपनीकडे 

सीसीआय ने कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या अगोदर नोंदणी सुरु केल्या. यासाठी वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका संगणका मध्ये सॉफ्टवेअर लोड करण्यात आले मात्र तेही व्यवस्थित चालत नाही. हे सॉफ्टवेअर चालवीण्यासाठी बसलेली कर्मचारी हिला मराठी आणि हिंदी पण येत नसल्याने शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली.  तालुक्यात 35 हजार शेतकरी आणि एका दिवसाला फक्त 10 शेतकऱ्याच्या नोंदी होत असल्याने शेतकरी आक्रमक झाले होते. 

प्रतिक्रिया 

एकाच संगणकामध्ये सॉफ्टवेअर लोड आहे. आणि तेही व्यवस्थित चालत नाही आहे.  संगणक चालक मराठी मुलगी ठेवली आहे. आमच्याकडे आणखी 10 संगणक आहे. त्या सर्व संगणकमध्ये सॉफ्टवेअर लोड करणार आहोत जेणेकरून शेतकऱ्यांना नोंदणी करण्यात त्रास होणार नाही. 
निळकंठ  आकोटकर 
सीसीआय परचेसर

Comments