पुणे येथे कुणबी समाजाचे राज्यस्तरीय स्नेहसंमेलन व उप वधू-वर मेळाव्याचे आयोजन**मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे किशोर टोंगे यांचे आवाहन*
*मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे किशोर टोंगे यांचे आवाहन*
वरोरा /भद्रावती : विदर्भातून शिक्षण घेऊन नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने पुणे येथे स्थायिक झालेल्या कुणबी समाजाच्या मुलांनी एकत्र येत आपणही समाजाचं देणं लागतो या भावनेतून तसेच एकमेकांना मदत व्हावी आचार विचारांचं आदान प्रदान व्हावं या उद्देशाने धनोजे कुणबी सामाजिक संस्था स्थापन केली असून दर दोन वर्षांनी वधू वर परिचय मेळावा व स्नेहामिलन आयोजित केल्या जात असल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष किशोर साधूजी टोंगे यांनी दिली.
यावर्षीचा राज्यस्तरीय स्नेहमिलन व वधू वर परिचय मेळावा 1 डिसेंबर 2024 रोजी मुनोत हॉल,गोखले नगर, पुणे येथे आयोजित केला असून वधू वरांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे मोठया प्रमाणात नोंदणी करावी असे आवाहन किशोर टोंगे यांनी यावेळी बोलताना केले.
समाजाची संस्था ही विचारांचं आदान-प्रदान, नोकरी व व्यवसायात मार्गदर्शन व मदत आणि आपल्या मागे राहिलेल्या समाज बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे.
अनेक तरुणांना पहिल्यांदाचं पुण्यासारख्या शहरात आल्यानंतर त्यांच्या समोर अनेक अडचणी येत असतात त्या सोडविण्यासाठी देखील संस्थेचे पदाधिकारी पुण्यात सहकार्य करत असतात.
गेल्या अनेक वर्षांपासून आमचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष राहुल धानोरकर, उपाध्यक्ष किशोर टोंगे, सचिव अमित कुरेकर व कोषाध्यक्ष मनोज बरडे यांच्या नेतृत्वात काम करत असून यावर्षी देखील पदाधिकाऱ्यांनी दिमाखात सोहळा साजरा करण्याचे नियोजन केले असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
या मेळाव्यात समाजाकरिता निःस्वार्थ काम करत असलेल्या सेवाभावी मान्यवरांचा सन्मान तसेच उत्तुंग व्यक्तिमत्वांचे मार्गदर्शन होणार आहे.
या सोहळ्यात चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर येथून देखील जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी सहभागी होणार असून सर्वांनी नावनोंदणी आणि प्रवासाचे नियोजन करावे अशी माहिती आयोजकांच्या वतीने संस्थेचे उपाध्यक्ष व भारतीय जनता पक्षाचे नेते किशोर टोंगे यांनी दिली.
Comments
Post a Comment