रद्द पेपर दिवाळी सुट्टीनंतर पहिल्याच दिवशी घेतल्याने पालकात नाराजी* *मुख्याध्यापिका ग्रेसी थॉमस यांचा अट्टाहास*

*रद्द पेपर दिवाळी सुट्टीनंतर पहिल्याच दिवशी घेतल्याने पालकात नाराजी*

 *मुख्याध्यापिका ग्रेसी थॉमस यांचा अट्टाहास*

अतुल कोल्हे भद्रावती : 
                प्रथम सत्राचा शेवटचा पेपर शाळेतील एका दुर्घटनेमुळे रद्द केल्या गेला. तोच पेपर दिवाळी सुट्ट्या नंतरच्या पहिल्या दिवशी घेण्यात आल्याने पालक तसेच विद्यार्थ्यांमध्ये तारांबळ उडाली. या संदर्भात सुमठणा येथील सेंट ॲन्स हायस्कूलच्या मुख्याध्यापीका ग्रेशी थॉमस यांना मोबाईल वरून विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल बंद दाखवीत होता.         सेंट ॲन्स हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा दि. २६ आक्टोबरला प्रथम सत्राचा शेवटचा पेपर होता. पेपर सुरू असताना शॉर्ट सर्किट झाल्याने गोंधळ उडाला. शिक्षकांसह विद्यार्थ्यांमध्ये या घटनेमुळे भीती निर्माण झाली. नंतर मुख्याध्यापिका ग्रेशी थॉमस यांनी पेपर रद्द करून तो दिवाळीनंतर घेणार असल्याचे जाहीर केले. त्यावेळी त्यांनी दिवाळी सुट्टीनंतर पहिल्याच दिवशी पेपर घेत असल्याचे सांगितले नाही. त्यामुळे विद्यार्थी निश्चिंत होते. अचानक दि. ५ नोव्हेबरला विद्यार्थ्यांना मोबाईल द्वारे सूचना पाठवून दि.६ नोव्हेबर या दिवाळीनंतरच्या शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी पेपर असल्याचे कळविले. विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये यामुळे तारांबळ उडाली. त्यातच ऋतू संक्रमणाचा काळ असल्याने काही विद्यार्थी आजारी सुद्धा होते. परंतु याकडे दुर्लक्ष करून शाळेने पेपर घेतला. परीक्षा द्यावयास आजारपणात सुद्धा विद्यार्थी हजर होते. सुट्टी आणि त्यात आजार यामुळे अनेक विद्यार्थी पेपर देण्याच्या मनस्थितीत नव्हते असे पालकांनी सांगितले.
 शाळेतील दुर्घटनेमुळे शेवटचा पेपर रद्द करण्यात आला. हा पेपर नंतर घेऊ असे मुख्याध्यापिका ग्रेसी थॉमस  यांनी सांगितले. परंतु तो दिवाळी सुट्टीनंतर शाळेच्या पहिल्या दिवशी घेतल्या जाईल असे सांगितले नाही. याबाबत मी त्यांना विचारणा करणार असल्याचे शाळेचे पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष चेतन खोब्रागडे यांनी सांगितले.


Comments