वृद्धाश्रमातील परिवारांसोबत संदीपभाऊंचा वाढदिवस साजरा.

वृद्धाश्रमातील परिवारांसोबत संदीपभाऊंचा वाढदिवस साजरा.

फक्त बातमी 13/12/2024

अहिल्याबाई होळकर महीला आश्रम येथे अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थाचे नवनिर्वाचित जिल्हा सरचिटणीस  संदिपभाऊ मोरे यांनी आपला वाढदिवस  आश्रमातील सर्व परिवारासोबत केक कापून व त्यांना भेट वस्तू व फळे देऊन साजरा केला. याप्रसंगी  त्यांनी आपले विचार व्यक्त करून आपल्या विचारातून आज पासुन या आश्रमाशी माझे जिव्हाळ्याचे नाते तयार झाले असे व्यक्त केले. 
याच शुभ वाढदिवसा प्रसंगी काही त्यांचे मार्गदर्शक व मित्र मंडळीनी समाज प्रेरणेचे विचार व्यक्त केले. व याच शुभ वाढदिवसा प्रसंगी उपस्थित असलेली मंडळी  सौ. अल्काताई पचारे अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्था विदर्भ संघटीका, मा. डॉ. भगवांनजी गायकवाड साहेब( भा.ज.पा. तालुका अध्यक्ष), मा. मधुसूदन टिपले साहेब, वैभव लोहकरे (शहर संघटन महामंत्री भाजयुमो), निशिकानत डफ (सामजिक कार्यकर्ते), अमितभाऊ आसेकर (वरोरा तालुका महामंत्री भाजयुमो) ,प्रवीण भाऊ हटवार, अभिजित गयनेवार ( शहर महामंत्री भाजयुमो) राजू भाऊ जिवतोडे, सौ रिना संदिप मोरे, रिया पचारे व इतर सर्व सहकारी मंडळी उपस्थित  होती.


Comments