भद्रावती,
तालुक्यातील वाघेडा (से )महसूल साजा पिरली येथे गाव असून परिसर जंगल व्याप्त असल्याने या जंगलात हिंसक प्राणी तसेच विषारी सरपटणारे साप आहे.
यामुळे परिसरातील शेतकरी आपला जीव मुठीत घेऊन पीक वाचविण्या साठी प्रयत्न करतात.
असेच आपल्या कपाशी मध्ये आंतरपीक तूर लावली होती त्या तुरीवर किडकनाशक फवारणी करण्यासाठी गेलेल्या शेतकरी श्री राकेश नत्थू जी बोथले वय 36 वर्ष याला दि 11-12-2024 ला दुपारी 1-00वाजता सर्प दंश झाला, हे घरच्यांना माहित होताच त्याला वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालय मध्ये दाखल केले.
तेथे तब्बेत गंभीर असल्यामुळे ग्रामीण जिल्हा रुग्णालय मध्ये भरती केले मात्र एक दिवस होऊन सुद्धा तब्बेतीत सुधारणा झाली नसल्याने दि 13-12-2024 ला रात्री अंदाजे 2 च्या सुमारास आपला जीव सोडला .
या शेतकऱ्याच्या जाण्यामुळे घरी असलेल्या पत्नी पपीता राकेश बोथले वय 32 मुलगा ची आयुष राकेश बोथले 13 शिक्षण 7 वी आणि मुलगी आरोही राकेश बोथले 8 वर्ग 2 मध्ये शिकत असून सोबत आई वडील म्हातारी आजी आणि दोन भावंडे अशा परिवार असून या युवा शेतकरी जाण्याने दुःखाचा डोंगर कोसळला आहे
साप आणि वाघ हे वन्यप्राणी असून शेतकरी यांना नेहमी या प्राण्या सोबत शेती करतांना संपर्कात राहावे लागतात , वन्य प्राणी हिंसक चालणारे तर कधी सरपटणारे प्राणी या दोन्ही प्राण्यामुळे जवळ पास सारखेच शेतकरी शेतमजूर मरण पावल्याच्या घटना घडत आहे त्यामुळे शेतकरी यांना वाघाने मारल्यास 25 लाख शासन अनुदान संबंधिताच्या नातेवाईक यांना देतात तसेच सापामुळे पण शेतकरी यांचा मृत्यू झाल्यास 25 लाख रुपये शासनाने अनुदान नातेवाईक यांना देण्यात यावे
Comments
Post a Comment