वरोरा : वडील स्व. संजय देवतळे हे कोणत्याही पदावर नसताना देखील अनेक व्यक्ती त्यांच्या सोबत होते.भंवरलाल चौधरी हे त्यापैकी एक होते. पडतिच्या काळात अशाप्रकारे सोबत राहणाऱ्या निष्ठावंत व्यक्तीच्या पाठीशी मी व माझे कुटुंब नेहमी खंबीरपणे उभे राहील असा विश्वास आमदार करण देवतळे यांनी उद्योजक भंवरलाल चौधरी यांच्यातर्फे आयोजित सत्काराला उत्तर देताना दिला. याप्रसंगी आमदार करण देवतळे यांच्या हस्ते भंवरलाल चौधरी संचालित श्री श्याम ग्रॅनाईट, स्टाईल व बीएलसी ,जेसीबी स्पेअर पार्ट शोरूमचे उद्घाटन पार पडले. गुरुवार दि.१२ डिसेंबर रोजी नागपूर- चंद्रपूर महामार्गावरील चिनोरा येथील चौधरी यांच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून वणी येथील माजी आमदार संजय रेड्डी बोदकुरवार ,श्वेता संजय देवतळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. विजय देवतळे , माढेळी येथील उद्योजक प्रकाश मुथा, माजी सैनिक मनोज उर्फ गुलाबराव जीवतोडे, रमेश राजुरकर, भद्रावती येथील प्रशांत शिंदे, सुनील कटारिया, उमेश शर्मा ,अमोल मुथा, प्रमोद मगरे, बाळू चिंचोलकर, संजय घागी उपस्थित होते. सदर कार्यक्रमात सर्वच प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आमदार करण देवतळे यांचे आगमन होताच रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आलेल्या जेसीबीतून त्यांच्यावर पुष्पवर्षाव करण्यात आला. तसेच ढोल ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करून भंवरलाल चौधरी यांनी नवनिर्वाचित आमदार करण देवतळे यांचा शाल ,श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे संचालन गिरीधर जाखोटिया यांनी केले. तर उपस्थितांचे आभार भंवरलाल चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाला शहर व परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment