इतर मागासवर्गीय कल्याण समितीची बैठक दि. 17 डिसेंबर 2024 रोजी दिल्ली येथे आयोजित आली होती. या सभेत ओबीसी कल्याण समितीच्या सदस्या तथा खासदार प्रतिभा धानोरकर यांनी ओबीसी संदर्भात अनेक मागण्या लावून धरल्या.
या बैठकीत प्रामुख्याने देशात संख्येने सर्वात जास्त असणाऱ्या ओबीसी समाजाचे प्रश्न कायमस्वरूपी सुटावे याकरिता त्यांनी केंद्रात ओबीसी मंत्रालयाची स्थापना करावी, हि मागणी खासदार धानोरकर यांनी लावून धरली. त्यासोबतच देशात जातनिहाय जनगणना होण्याकरीता इतर मागासवर्ग कल्याण समिती द्वारा सरकार कडे प्रस्ताव पाठविण्यात यावा अशी देखील मागणी केली. तसेच क्रिमीलेअर च्या उत्पन्नाची मर्यादा दि. 13 सप्टेंबर 2017 पासून अद्यापही वाढविण्यात आलेली नाही, त्यामुळे ओबीसींचा नौकरीतील अनुषेश बघण्यास अडचण निर्माण होत आहे. तरी क्रिमीलेअर च्या उत्पन्नाची मर्यादा वाढवावी अशी मागणी देखील खासदार प्रतिभा धानोरकर यांनी ओबीसी कल्याण समितीच्या अध्यक्षांकडे केली. त्यासोबच, ओबीसी प्रवर्गामधील विद्यार्थ्यांना पुर्ण व जलद गतीने शिष्यवृत्ती मिळावी याकरिता सरकार ने पुढाकार घेण्याकरीता समितीने प्रस्ताव पाठवावा अशी देखील खासदार धानोरकर यांनी मागणी केली. यावेळी समितीच्या बैठकीत इतर मागासवर्गीय कल्याण समितीचे संचालक श्री महेश्वर यांच्यासह इतर मागासवर्गीय कल्याण समितीच्या सदस्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
Comments
Post a Comment