जीएमआर वरोरा एनर्जी लिमिटेड तर्फे मल्टीस्पेशालिटी हेल्थ कॅम्पचे आयोजिन.
200 अधिक कामगारांच्या कुटुंबांना लाभ.
20 डिसेंबर 2024
जीएमआर वरोरा एनर्जी लिमिटेड , जीएमआर वर लक्ष्मी फाउंडेशन आणि आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली आरोग्य विषयक सेवेचा एक भाग म्हणून 20 डिसेंबर 2024 रोजी जीएमआर ग्रीन टाऊनशिप मजरा रै. वरोरा येथे मल्टी स्पेशालिटी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते हे शिबिर समाजाच्या आणि जीएमआरशी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी व कल्याण साठी आयोजित करण्यात आले होते.
या आरोग्य शिबिरामध्ये प्रामुख्याने प्रसुती व स्त्रीरोग विभाग ,औषध विभाग, बालरोग विभाग, त्वचारोग विभाग, शस्त्रक्रिया विभाग व अस्तिव्यांग विभागातील तज्ञ डॉक्टर उपस्थित होते. या शिबिरादरम्यान एकूण 163 रुग्णांनी त्यांच्या विविध आजारावर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन लिपीत प्रोफाइल एच बी ए वन सी आणि थायरॉईड यासारख्या चाचण्या करून घेतल्या. शिबिरात आलेल्या सर्व रुग्णांना मोफत औषधाचे वाटप करण्यात आले आणि गंभीर व अत्यंत गंभीर आजार असलेल्या रुग्णांची ओळख करून त्यांना तज्ञ डॉक्टरांकडून उपचार घेण्याचा सल्ला देण्यात आला.
कंपनीतर्फे कर्मचारी कल्याणासाठी जीएमआर वरोरा एनर्जी लिमिटेड आणि जीएमआर वर लक्ष्मी फाउंडेशन यांनी त्यांच्या दान उत्सव उपक्रमांतर्गत 240 कामगार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना हृदय उच्च रक्तदाब दमा मधुमेह यासह 13 प्रकारच्या जुनाट आजारांसाठी आरोग्य कार्डचे वाटप केले.
या कार्डची वितरण जी डब्ल्यू ई एल चे श्री धनंजय देशपांडे सीओओ थर्मल यांनी GWEL कर्मचारी आणिHODs यांच्या उपस्थितीत केले.
दान उत्सवा दरम्यान 51 GWPL कर्मचाऱ्यांनी AVBRH च्या हेल्थ कार्ड योजनेअंतर्गत त्यांच्या कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी दान उत्सवाच्या मनी डोनेशन कार्यक्रमांतर्गत 24000 रुपयाची योगदान दिले. या कार्डधारकांना तज्ञ डॉक्टरांचा मोफत सल्ला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोफत चाचण्या मोफत औषधे रुग्णालयात दाखल असताना मोफत प्रवेश आणि जीवन आणि विशेष चाचण्यावर सवलत कर्मचाऱ्यांना देण्यात आली.
या कार्यक्रमासाठी मदत करणाऱ्या सर्व सेवाभावी संस्थांना कंपनीने आभार मानले असून येणाऱ्या काळात यापेक्षाही चांगल्या सुविधा देण्याचे मानस व्यक्त केले आहे.
Comments
Post a Comment