*सी.डी.सी.सी.बँकेची परीक्षा नव्याने घ्या**सामाजिक कार्यकर्ते शुभम आमने यांची जिल्हाधिकाऱ्या कडे मागणी

*सी.डी.सी.सी.बँकेची परीक्षा नव्याने घ्या*
*सामाजिक कार्यकर्ते शुभम आमने यांची जिल्हाधिकाऱ्या कडे मागणी 

सारथी ठाकूर, वरोरा 

वरोरा :- सी.डी.सी.सी बँक चंद्रपूर ची शिपाई कर्मचारी भरती ची प्रकिया सुरु आहे. राज्यभरातून ऐकतीस हजार उमेदवारांनी अर्ज केले आहे. तरी त्यांची परीक्षा दि. २१ डिसेंबर २०२४ रोजी वेळापत्रक मध्ये  दिलेल्या ठिकाणी सुरु झाली असता त्या ठिकाणी 
परीक्षा चालू झाली असता काही प्रश्न सोडविताचं परीक्षा बंद पडली आणि सोडविलेले प्रश्नाचं उत्तर निवडले असता ते उत्तर येत येत नसून ते दुसर उत्तर होत  होते. या सर्वं भोळ कारभारात उमेदवारांच आर्थिक नुकसान झालं असून प्रवासाचा त्रास देखील सहन करावा लागला आहे ५०० कि.मी.पेक्षा जास्त अंतरावर परीक्षा केंद्र दिल्यामुळे तो त्रास सहन करावा लागला आहे. सी.डी.सी.सी. बँक परीक्षा घोटाळा संदर्भात चौकशी करून दोषी वर कारवाई करणे आणि खाली उमेदवारांच्या मागण्या पूर्ण करा अशी विनंती जिल्हाधिकारी यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत केली आहे.
मागण्या 
1) समंधित कंपनी वर कार्यवाही करा 
2) सर्व बँक भरती प्रकियेची चौकशी करून दोषीवर कायदेशीर कार्यवाही करा.
3) उमेदवाराला ५०० कि. मी. वरून एका जिल्ह्यातून दुसऱ्या  जिल्ह्यात पैसे खर्च करून प्रवास करत उमेदवार परीक्षा ठिकाणी जाव्ह लागलं असून त्यांच आर्थिक नुकसान झाल.तरी ते परीक्षा कंपनी कडून वसून करून उमेदवारांना  रक्कम ५०००/ परत द्या.
४) सर्वं भरती परीक्षा रद्द करून परत दुसऱ्याने परीक्षा घ्या 
५) उमेदवारांच्या परीक्षा १०० कि. मी. अंतराच्या आत घ्या.इ. मागण्या पूर्ण करा अशी विनंती सामाजिक कार्यकर्ते शुभम आमने यांनी केली. त्यावेळी अन्य परीक्षा उमेदवार देखील मोठया संख्येने उपस्थित होते.

Comments