मराठा अकरा बटालियन जवानाचा अपघाती मृत्यू,

मराठा अकरा बटालियन जवानाचा अपघाती मृत्यू,

वरोरा 
फक्त बातमी 

तालुक्यातील पिंपळगाव मारोती या छोट्याशा खेड्यातील दोन्ही भाऊ भारतीय सैन्य मध्ये सेवा करत असताना  वाहन खोल दरीत कोसळल्याने अपघात झाला, या वाहनांमध्ये जवळपास 18 जवान असून पाच व्यक्तीचा सदर मृत झाल्याचे पिंपळगाव येथील मृतक जवान यांच्या वडिलाला रजेवर वर्धा या स्वगावी  आलेल्या जवानांनी घरी येऊन सदर माहिती दिली.
 मृत्यू जवानाचे  नाव श्री अक्षय दिगंबर निखुरे हा बीए फायनल ला शिक्षण घेत असतानाच भारतीय सैन्य दलात वयाच्या 21 व्या वर्षी सन 2018 मध्ये रुजू झाला त्याचे वडील अल्पभूधारक शेतकरी असून वडील आणि आई दोघेही घरची चार एकर  शेती करतात.
 त्यांचे अपघाती झाल्याने परिसरात दुःखाचा डोंगर कोसळला आहे 
 आज घरची परिस्थिती हलाखीची असताना आपले दोन्ही मुले भारतीय सैन्य दलात पाठवणाऱ्या या वडिलांचे कौतुक परिसरातील जनता करीत आहे .
 प्राप्त माहितीनुसार घरी आई-वडील आणि  भारतीय सैन्य दलात असलेला एक भाऊ असा परिवार असून मृतक जवानांचे उद्याला स्वगावी शासकीय इस्तमात अंतिम संस्कार करण्यात येईल

चंद्रपूर जिल्ह्याचे विर जवान ता. वरोरा येथील ग्रामपंचायत टेमुर्डा अंतर्गत येणाऱ्या मौजा पिंपळगावचे भुमिपुत्र शहीद अक्षय निखुरे यांना जम्मू काश्मीर येथे देशाचे कर्तव्य बजावत असतांना विर गतिस प्राप्त झाले आहे.

मराठा बटालियन अकरा मध्ये मृतक सैनिक यांचा लहान भाऊ हा पण मराठा बटालियन अकरा मध्ये सोबत  सेवा करीत आहे .
त्यामुळे प्राप्त माहिती श्री निलेश निकुरे घरी देत असून शहीद अक्षय निकुरे यांचे पार्थिव आज सायंकाळी ठीक 7.30वाजता नागपूर विमानस्थळा पोहचणार,
तेथे वीर जवनाला सलामी दिल्यानंतर ते पार्थिव कामटी येथील नागपूर विभागीय कार्यलय मध्ये रात्रीला ठेवण्यात येईल त्यानंतर सकाळी ते पार्थिव स्वगावी पिपंळगाव 
(मा ) त वरोरा येथे आणण्यात येईल . ठीक 10.30 अंतिम संस्कार करण्यात येईल.

Comments