*थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या कार्यातून प्रेरणा घेवून रुग्णसेवेचे व्रत अविरत सुरू ठेवणार : रविंद्र शिंदे*

*थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या कार्यातून प्रेरणा घेवून रुग्णसेवेचे व्रत अविरत सुरू ठेवणार : रविंद्र शिंदे* 

*नंदोरी ( बु. ) येथे सर्वरोग निदान शिबिरात तिनशे चार रुग्णांची मोफत आरोग्य  तपासणी* 

भद्रावती 
थोर समाजसेवक बाबा आमटे यांनी  समाजाकडून  नाकारलेल्या हजारो कुष्ठरुग्ण, दिनदुबळे, दिव्यांग व द्दष्टी नसलेल्या हजारो रुग्णांना मातृ प्रेमाने जवळ घेऊन त्यांच्यावर औषधोपचार करण्यासाठी प्रयत्न केले. यामुळे  यासर्वांना  जगण्याची नवी उमेद मिळाली. स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र चॅरिटेबल ट्रस्टचे “रुग्णसेवा हिच ईश्वर सेवा” हे ब्रिद असून आमची ट्रस्ट थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या कार्यातून प्रेरणा घेवून रुग्णसेवेचे व्रत अविरत सुरू ठेवणार असल्याचे प्रतिपादन ट्रस्टचे संस्थापक तथा शिवसेना जिल्हा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी केले.
      याप्रसंगी  रविंद्र शिंदे पुढे म्हणाले की, १९९८ पासून आमचे सामाजिक कार्य सुरू आहे. ट्रस्टच्या माध्यमातून सुरू असलेली जनसेवा स्वार्थासाठी नसून केवळ जनकल्याणासाठी आहे. कोरोना संक्रमण काळात आमच्या ट्रस्टला चंद्रपूरसह, गडचिरोली आणि  वर्धा जिल्हयातील सुमारे साडेसहा हजार रुग्णांची सेवा करण्याचे महाभाग्य प्राप्त झाले. ट्रस्टच्या माध्यमातून विविध योजना सुरू केल्या आहे. ट्रस्टचे कार्यक्षेत्र राष्ट्रीय पातळीवर असून पूणे व मुंबई येथील गरजवतांना सुध्दा ट्रस्टने मदत केली आहे. येत्या काळात ट्रस्टच्या माध्यमातून क्रीडाप्रेमींना प्रोत्साहित करण्यासाठी क्रीडा अँकेडमी सुरु करण्यात येईल. सोबतच महिलांना स्वावलंबी करण्यासाठी शिलाई मशीनचे वितरण करण्यात येईल, असेही रविंद्र शिंदे यांनी सांगितले.
      तालुक्यातील नंदोरी (बु.) येथील जि. प. उच्च प्राथ. शाळा येथे थोर समाजसेवक  बाबा आमटे यांच्या जयंतीनिमित्त आज दि. २६ डिसेंबर २०२४ रोज गुरुवारला स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सर्व रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी शिबिराच्या उद्घाटनीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ट्रस्टचे अध्यक्ष रविंद्र शिंदे उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते.
    शिबिराचे उद्घाटन वरोरा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रफूल खुजे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी शिबिर प्रमुख डॉ.वसंत वाघ, नंदोरी (बु.) चे सरपंच मंगेश भोयर, ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, ग्रा.पं. सदस्य शारदा जिवतोडे, पं.स.चे माजी  सभापती धनराज विरुटकर, भद्रावती कृ.उ.बा. समितीच्या उपसभापती अश्लेषा भोयर, भटाळीचे  सरपंच सुधाकर रोहनकर, डॉ. सचिन दगडी, गजानन उताने, घनश्याम ढवस, भानुदास ढवस, रमेश तिखट रवी खाडे, शरद खामनकर, तुळशीराम लांबट, अभिजित कुडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
      याप्रसंगी  ट्रस्टच्या वतीने शंभर जेष्ठ नागरिकांना आरोग्य तपासणी कार्डचे मोफत वितरण करण्यात आले. या शिबिरात परीसरातील तिनशे चार नागरिकांसह नंदोरी (बु.) येथील जि.प. उ. प्राथ. शाळा व महात्मा ज्योतीबा फूले विद्यालयाच्या विद्यार्थांची सुध्दा मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
     याप्रसंगी धनराज विरुटकर, डॉ. प्रफूल खुजे, डॉ. सचिन दगडी,रवि खाडे.डॉ. वसंत वाघ आणि सरपंच मंगेश भोयर यांनी समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. धनराज आस्वले, सुत्रसंचलन आशा ताजने व आभार प्रिती पोहाणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता जयश्री फाले, रूपाली साखरकर, सरला मालोकर, आशा ताजणे, सचिन वेलफुलवार, महेश यादव तसेच नंदोरी (बु) गावातील युवा मंडळी यांनी मोलाचे परिश्रम घेतले.

Comments