चंद्रपूर जिल्ह्यातील बेपत्ता व्यापारी अरुणा काकडेचा सापडला मृत्यूदेह, गळा दाबून केले ठार, बडतर्फ पोलीस कर्मचारी नरेश डाहूले याला अटक
चंद्रपूर जिल्ह्यातील बेपत्ता व्यापारी अरुणा काकडेचा सापडला मृत्यूदेह, गळा दाबून केले ठार, बडतर्फ पोलीस कर्मचारी नरेश डाहूले याला अटक,
26 नोव्हेंबरपासूनच्या बेपत्ता आणि खून प्रकरणाचा झाला उलगडा
अकूंश अवथे चंद्रपूर
मागील 15 दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील बेपत्ता असलेल्या व्यापारी महिलेचा मृतदेह नागपुरातील बेसा भागातील निर्जन स्थळी आढळला. या प्रकरणी चंद्रपूर पोलिसांनी बडतर्फ पोलीस कर्मचारी नरेश डाहुले याला अटक केली आहे.
देवांश जनरल स्टोर्स च्या संचालिका 37 वर्षीय अरुणा अभय काकडे या 26 नोव्हेंबर रोजी नागपुरातील इतवारी मार्केट मध्ये दुकानातील सामान खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हापासून त्या बेपत्ता होत्या. चिमूर पोलीस स्टेशनमध्ये याविषयी मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली. चिमूर पोलिसांना सिम रिचार्ज वरून आरोपीला शोधण्यात यश मिळाले. अरुणा चिमूर व्यापारी संघटनेच्या सदस्या असल्याने जिल्हा व्यापारी मंडळाने पोलीस अधीक्षकांना याबाबत निवेदन देत दबाव वाढविला होता. पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाचा तपास चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार प्रभावती एकुरके यांच्याकडे सोपविला होता. पोलिसांना अखेर आरोपी गवसला. बडतर्फ पोलीस कर्मचारी नरेश डाहूले याची पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली. 26 नोव्हेंबर रोजी अरुणा काकडेची आपली नागपुरात भेट झाली होती. अरुणा ही माझी वर्गमैत्रिण होती. त्यामुळे आमची चांगली ओळख होती. आम्ही दिवसभर सोबत होतो, त्यानंतर रेशीमबाग मैदानावर आमच्या दोघात वाद झाला, मी यावेळी रागाच्या भरात अरुणाचा गळा आवळून खून केला व त्यानंतर आपल्या चारचाकी वाहनात अरुणा चा मृतदेह टाकत बेसा येथील निर्जन स्थळी असलेल्या घरातील शौचालयाच्या टाक्यात तिचा मृतदेह टाकला व पसार झाल्याची कबुली आरोपीने दिली. 2023 साली नरेश डाहूले हा स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत होता. त्यावेळी शहरात अनेक घरफोडीच्या घटना घडल्या. त्या प्रकरणात मुख्य आरोपी नरेश डाहूले ला अटक करण्यात आली होती. त्यानंतर पोलीस विभागाने नरेश डाहूले ला बडतर्फ केले. चिमूर पोलिसांनी अरुणा प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
Comments
Post a Comment