स्थानिकांचा रोजगार डावल्यामुळे शेकडो परिवारांवर उपासमारीची वेळ येणार.ॲशटॅक कंपनीला दुहेरी आर्थिक फायदा.
ॲशटॅक कंपनीला दुहेरी आर्थिक फायदा.
फक्त बातमी
चेतन लुतडे, वरोरा
महाराष्ट्र शासन धोरणा नुसार स्थानिकांना ८० टक्के काम मिळण्याचे धोरण असुनही जी एम आर प्रायव्हेट कंपनी ही नियमाला बगल देत स्थानिक ट्रॉन्सपोर्ट धारकावर अन्याय करून स्वहितासाठी बाहेरील ट्रॉन्सपोर्ट धारकांना कोळशाची राख उचलण्याची मुभा देत आहे. त्यामुळे स्थानिक ट्रॉन्सपोर्ट धारकांना उपासमारीची वेळ आली असून ट्रान्सपोर्ट असोसिएशन आंदोलन उभारण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वरोरा लोकल ट्रॉन्सपोर्ट असोसिएशन वरोरा व्दारे वीस ते पंचवीस सुशिक्षीत बेरोजगारानी बँकेचे कर्ज काढून ट्रान्सपोर्ट व्यवसाय सुरू केला होता. वरोरा शहराला लागून जी एम आर कंपनी आहे . यामध्ये GMR कंपनीकडून कोळशाची 20% राख ट्रान्सपोर्ट कंपनीला विना मोबदला देण्यात आली होती. त्यामुळे तालुक्यातील वीटभट्टी ना लागणारी राख पुरवठा स्थानीक ट्रान्सपोर्टर कडून होत होता. कंपनीने कोळशाची राख स्थानिक व्यवसायिकांना पुरवणे कमी केल्याने स्थानिकांच्या रोजगारीवर मोठा फरक पडला आहे.
त्यामुळे शंभर ते दीडशे परिवाराच्या रोजगारावर फरक पडला आहे. सध्या कोळशाची राख ॲशटॅक कंपनीला मोठ्या प्रमाणात दिल्याने स्थानिकांच्या रोजगारावर विपरीत परिणाम पडला आहे. त्यामुळे स्थानिक वरोरा लोकल ट्रान्सपोर्ट असोसिएशन वरोरा यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली कैफियत पत्रकारांपुढे मांडली आहे.
स्थानिक प्रशासन व पोलिसांना वारंवार निवेदन देऊन सुद्धा हा प्रश्न सुटलेला नाही. कंपनी प्रशासनातील काही लोकांनी हात मिळवणी करून ॲशटॅक कंपनीमार्फत यवतमाळ जिल्ह्यातील ट्रान्सपोर्टर कडून स्थानिक बाजारपेठेत कमी दरात कोळशाची राख पुरवण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू केला आहे . यामध्ये ॲशटॅक कंपनीला कोळशाची राख महामार्ग किंवा खदान भरण्यासाठी टेंडर दिलेला आहे. मात्र आता कुठलीही टेंडर नसल्याने ही राख वीट भट्ट्या आणि इतर स्थानिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात विकल्या जाते. त्यामुळे ॲशटॅक कंपनीला दुहेरी फायदा होत असून. स्थानिकांच्या रोजगारावर विपरीत परिणाम झाला आहे.
या प्रश्नाकडे स्थानिक आमदार आणि खासदार व कामगार आयुक्त यांनी लक्ष देण्याची गरज असून कंपनी प्रशासनावर कोणाचाही अंकुश राहिलेल नाही . असे मत येथील स्थानिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन ने केली आहे.
येणाऱ्या कालावधीत लोकल ट्रान्सपोर्ट असोसिएशन हा प्रश्न निकाली न लागल्यास भव्य आंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
या पत्रकार परिषदेमध्ये अध्यक्ष महेश आगलावे, उपाध्यक्ष पवन राम ,सचिव आशिष रोडे, कोषाध्यक्ष निलेश डोंगरवार सहित वरोरा लोकल ट्रान्सपोर्टेशन असोसिएशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment