बल्लारपुर पोलीसांनी अवैध्यरित्या ०३ अग्निशस्त्र व १८ जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या आरोपींच्या आवळल्या मुसक्या
बल्लारपुर पोलीसांनी अवैध्यरित्या ०३ अग्निशस्त्र व १८ जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या आरोपींच्या आवळल्या मुसक्या
फक्त बातमी
पोलीस ठाणे बल्लारपुर हद्दीतील मौजा साईबाबा वार्ड बल्लारपुर व फुकटनगर बामणी ता. बल्लारपुर येथे मुखबिरच्या खबरेवरुन कारवाई करुन आरोपी नामे- १) मुकेश ऊर्फ मुक्कु विश्वनाथ हलदर वय-२८ वर्षे. २) अमित दिलीप चक्रवर्ती वय ३४ वर्षे दोन्ही रा. साईबाबा वार्ड बल्लारपुर यांचे ताब्यातुन ०१ पिस्टल व १८ जिवंत काडतुस जप्त केले. तसेच आरोपी नामे- ३) जितेंद्रसिंग ऊर्फ निक्कु गोविंदसिंग डिलोन वय-२९ वर्षे, रा. शिवनगर वार्ड बल्लारपुर जि. चंद्रपुर. ४) संघर्ष ऊर्फ गोलु बंडु रामटेके वय-२७ वर्षे रा. संतोषी माता वार्ड बल्लारपुर जि. चंद्रपुर. ५) काश्मीरसिंग महेंद्रसिंग बावरी वय-२० वर्षे रा. फुकटनगर बामणी ता. बल्लारपुर जि. चंद्रपुर यांचे ताब्यातुन एकुण ०२ नग देशी बनावटीचे पिस्टल असा एकुण ९७,०००/-रु मुदेदेमाल जप्त करुन पोलीस ठाणे बल्लारपुर गुन्हा रजि. क्रं.१०९१/२०२४ कलम-३/२५ ऑर्म अॅक्ट व अप.क्रं. १०९३/२०२४ कलम-३/२५ आर्म अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद करुन आरोपीतांना दिनांक-०४/१२/२०२४ ला अटक करण्यात आली आहे..
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. मुमक्का सुदर्शन सा., मा. अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु मॅडम., श्री. दिपक साखरे सा. उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा यांचे मार्गदर्शनात पो.नि. सुनिल वि.गाडे, सपोनि. ए.एस.टोपले, पोउपनि. हुसेन शहा, सफी. आंनद परचाके, पोहवा. सुनिल कामटकर, पोहवा. पुरुषोत्तम चिकाटे, पोहवा. रणविजय ठाकुर, पोहवा. संतोष दंडेवार, पोहवा. संतोष पंडीत, सत्यवान कोटनाके, पोअं. विकास जुमनाके, शरदचंद्र कारुष, वशिष्ठ रंगारी, शेखर माथनकर, लखन चव्हाण, खंडेराव माने, मिलींद आजम, भुषण टोंग, भास्कर चिचवलकर, मपोअं. अनिता नायडु इ. स्टॉफ यांनी केली आहे.
Comments
Post a Comment