अकूंश अवथे चंद्रपूर
बांगलादेशातील हिंदू समाजावर मागील अनेक महिन्यापासून अत्याचार सुरु आहे . ज्यात हल्ले, हत्या, लुटमार, जाळपोळ आणि महिलांचा अमानुष छळ, हिंदू आणि अल्पसंख्यांकांच्या धर्मिक स्थळांची विटंबणा सुरु केली आहे. या घटनेचा विरोध करण्यासाठी आज सोमवारी चंद्रपूर शहरात बंगाली समाज एकता संघर्ष समितीचा वतीने एकता रॅली काढण्यात आली . हि एकता रॅली बंगाली कॅम्प दुर्गा माता मंदिर येथून निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली . या एकता रॅलीत बंगाली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकारी विनय गौडा यांना बंगाली समाज एकता संघर्ष समितीचा वतीने निवेदन देण्यात आले.
Comments
Post a Comment