*अनोळखी मृत्यकाची ओळख पटविण्याकरीता संपर्क करण्याचे आवाहन*


*अनोळखी मृत्यकाची ओळख पटविण्याकरीता संपर्क करण्याचे आवाहन*   

चंद्रपूर, दि.  6  : वरोरा रेल्वे स्टेशन येथे दक्षिण एक्सप्रेस मधून एका अनोळखी पुरुषाला खाली उतरवून सरकारी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, असे बल्लारशहा ड्यूटी रेल्वे स्टेशन उपप्रबंधक यांनी लेखी मेमोद्वारे पोलिसांना कळविले. त्यानुसार अकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली असून सदर इसम बेवारस असल्याने अनोळखी पुरुषाची आजपावेतो ओळख पटलेली नसून नाव, पत्ता किंवा नातेवाईकाबाबत माहिती मिळालेली नाही.

*मृतकाचे वर्णन :* अनोळखी पुरुष, रंग -सावळा, बांधा - सडपातळ , उंची – 5 फुट 2 इंच, केस – काळे, समोर टक्कल, चेहरा – लांब, नाक – सरळ. उजव्या हातावर इंग्रजीत एस.एम असे नाव लिहिलेले व मनगटात शेंदरी रंगाचा धागा. अंगात पांढ-या रंगाची सॅन्डो बनियान, काळ्या रंगाचे जॅकेट आणि हिरव्या रंगचा लोअर घातला आहे.

सदर अनोळखी मृतकाबाबत कोणालाही माहिती असल्यास तपासी अंमलदार धनराज नेवारे (मो. 9823442292) या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.

०००००

Comments