बालाजी ऍग्रो इंडस्ट्री येथे सी सी आय कापूस खरेदी शुभारंभ

बालाजी ऍग्रो इंडस्ट्री येथे सी सी आय कापूस खरेदी शुभारंभ 

वरोरा 
चेतन लुतडे 

वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेली बालाजी ऍग्रो इंडस्ट्रीज येथे कापूस खरेदी शुभारंभ दरम्यान शेतकऱ्याचा मानसन्मान करून कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव बालाजी ऍग्रो इंडस्ट्रीजचे मालक आणि शेतकरी उपस्थित होते 

परोरा तालुक्यातील नामवंत बालाजी ऍग्रो इंडस्ट्रीज येंसा येथे . सी सी आय कापुस खरेदी शुभारंभ संपन्न झाला. या प्रसंगी प्रथम कापुस विक्रीला आणणारे  शेतकरी श्री सदाशिव रामराव वरभे रा. हिरापुर यांचा मानठेवत कापुस भाव 7521 लावण्यात आला.या कार्यक्रमप्रसंगी सी सी आय चे अधिकारी श्री नीळकंठजी अकोटकर ,बाजार समितीचे सचिव श्री चंद्रसेनजी शिंदे जीनिंग चे मालक श्री निरज बाबू गोठी ,श्री संदिपजी सेठीया, श्री आनंदजी गोठी उपस्थित होते.

Comments