वरोरा : - येथील शेषरत्न बहुउद्देशीय संस्था आणि रोटरी क्लब तर्फे रविवार दि.८ डिसेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.सरकारी रक्तपेढी चंद्रपूर यांच्या मार्फत डोंगरवार चौकातील महावीर भवन येथे सकाळी ९ ते दुपारी ३ वाजे पर्यंत रक्तदान शिबीर आयोजित होणार आहे.
काही महिन्यांपासून चंद्रपूर, वर्धा, नागपूर या शहरातील सरकारी तसेच खाजगी रक्तपेढी मधे २० ते २५ टक्के रक्तच उपलब्ध होत आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी शैषरत्न बहुउद्देशीय संस्था वरोरा आणि रोटरी क्लब वरोरा यांनी पुढाकार घेतला आहे. या दोन्ही संस्थेच्या वतीने रविवार दि. ८ डिसेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात जास्तीत जास्त संख्येने रक्तदात्यांनी स्वतःचे कर्तव्य समजून पुढाकार घेऊन रक्तदान करावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. थॅलेसेमिया, सिकलसेल, कर्करोग, डेंग्यू, डिलिव्हरी रुग्णां सोबतच अपघात ग्रस्त रुग्णांना रक्ताची मोठी आवश्यकता असते. वेळेवर रक्त उपलब्ध न झाल्यास त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न असतो. यामुळे सदर शिबिरात रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान करावे असे आवाहन *धिरज लाकडे* अध्यक्ष शेषरत्न बहुउद्देशीय संस्था व *बंडु भाऊ देऊळकर* अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ वरोरा यांनी केले आहे.
Comments
Post a Comment