भटाळा परिसरात पांढरा दगडाच्या खाणीत मोठ्या प्रमाणात उत्खनन
वरोरा
वरोरा तालुक्यातील टेमुर्डा, पिंपळगाव, मोवाडा,मांगली, तळेगाव व भटाळा येथे पांढऱ्या दगडाच्या फार मोठा साठा असून वडार समाजाच्या लोकांना त्यांच्या उदारनिर्वाह करण्यासाठी त्यांना हक्काचा रोजगार म्हणून येथे काही प्रमाणात लिज देण्यात आल्या परंतु काही वेगळ्याचं समाजाच्या ठेकेदारांनी येथे आपला दबदबा तयार करून आधुनिक पद्धतीने दगड काढण्यासाठी ब्लॉस्टिंगचा वापर करून व जेसीबी मशीन द्वारे दगड गिट्टी चे अवैध उत्खनन सुरु केले, दरम्यान या भटाळा परिसरात भवानी मंदिरा लगत होतं असलेले अवैध उत्खनन यावर प्रशासन काहीही कार्यवाही करत नाही.
आणि ज्यांच्या लिज आहे आणि ज्यांची टीपी आहे त्यांना अडथळा निर्माण करत आहे.
त्यामुळे अवैध उत्खनन करणाऱ्यांना प्रशासन पाठीशी घालून शासनाच्या महसूल चोरीत सहभागी होतं असल्याचा दुर्दैवी प्रकार होतं असल्याने हा प्रकार थांबवा अशी मागणी होतं आहे.
या परिसरात असलेल्या पांढऱ्या दगडाच्या खाणी आहेत ज्यातून संपुर्ण जिल्हा व इतर जिल्ह्यांत पांढऱ्या दगड पाठविला जातो या खाणी म्हणजे वडार समाजाला आपली उपजीविका भागविण्याचे फार मोठे साधन आहे .वडार समाजातील एका व्यक्तीला 200 ब्रासची परवानगी एका वर्षांकरिता शासनाकडुन दिल्या जाते मात्र वडार समाजाचे ठेकेदार त्यांच्या नावावर परवागी घेऊन बऱ्याच खाणी चालवीत आहे, .शासनाकडुन वडार समाजाच्या व्यक्तीला परवानगी देते वेळेस काही अटी व शर्ती दिल्या जाते.त्या नुसारच पांढरा दगड काढुन आपली उपजिविका करायची असते हा नियम व अटी शर्ती मध्ये प्रामूख्याने दगड हाताने,हातोडा व छंनी ,फोडुन काढायचा असतो मात्र काही ठेकेदाराकडुन हा नियम न पाळता ब्लास्टिंग मशिन ने छिद्रे पाडुन व.त्यानंतर त्यात बारुद टाकुन दगड फोडऱ्या जाते व जेसीबी लावुन दगड काढऱल्या जाते .ब्लास्टिंग व जेसीबी लावनाची परवानगी नसुन सुद्धा त्याचा वापर भटाळा येथील सर्वे नंबर 36 या खाणीला परवानगी नसताना होतं आहे व महसूल प्रशासन साखर झोपेत गुंग आहे असे चित्र दिसत आहे, त्यामुळे महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने या ऐतेहासिक परिसरात भवानी माता मंदिर असतांना ब्लॉस्टिंग चे हादारे बसून येथील ऐतेहासिक मंदिरे उध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे त्यामुळे तहसील प्रशासनाने याकडे लक्ष देऊन कार्यवाही करावी अशी मागणी होतं आहे.
Comments
Post a Comment