गजानन महाराज मंदिर टागोर नगर येथे भव्य जागतिक पारायण सोहळाचे आयोजन .
वरोरा
अनिल नौकरकार
वरोरा येथील संत गजानन महाराज मंदिर टागोर नगर अभ्यंकर वॉर्ड 12 जानेवारीला भव्य जागतिक पारायण सोहळा पार पडला.
जागतिक शांतता ,स्त्री सशक्तिकरण, स्त्रीभ्रूणहत्या रोखणे आणि सकल मानव जातीच्या कल्याणाकरिता गजानन महाराजांची कृपा प्राप्त करणे या उद्देशाने एकाच दिवशी एकाच वेळी जगभरातील श्री गजानन महाराजांच्या भक्तांनी जागतिक पारायण करून विजय ग्रंथाचे वाचन करावे यासाठी 12 जानेवारीला येथील टागोर नगर मधील संत गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये जागतिक पारायण दिनाचे आयोजन करण्यात आले श्री संत गजानन महाराज शेगाव भक्त परिवाराचे सन 2013 पासून श्री संत गजानन महाराजांचे विजय ग्रंथाचे भव्य जागतिक पारायण कार्यक्रम दरवर्षी जानेवारी महिन्याच्या दुसरा रविवार हा जागतिक पारायण दिवस पाळण्याचे निश्चित करण्यात आले यानुसार दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री संत गजानन महाराज मंदिर टागोर नगर येथे जागतिक पारायण दिवसाचा सोहळा संपन्न झाला यावेळी सौ अनिता नौकरकर, दिशा कावटी, माधुरी सातभाई, सुनिता खीरटकर, संगीता बाळबुदे स्वाती वानखेडे सुनिता खापणे ललिता बोथले,ज्योती डाहूले,सौ.बावणे काकू आधी सह 251 महिला व पुरुषांनी विजय ग्रंथाचे पारायण केले हा सोहळा यशस्वी करण्यासाठी आयोजन कमिटीचे नितीन नक्षीने अनिल बाळबुदे अशोक रोकडे सुरेश आगबतनवार यासह सर्वांनी परिश्रम घेतले.
------------------------------
Comments
Post a Comment