चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात सरपंच महोत्सव साजरा होणार.

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात सरपंच महोत्सव साजरा होणार. 

वरोरा  20/1/25
चेतन लूतडे 

चंद्रपूर जिल्ह्यातील  वरोरा शहरात  तीन दिवसीय सरपंच महोत्सव साजरा करण्यात येत आहे. विविध ग्राम पंचायत, सरपंच एकत्र येऊन हा वरोरा शहरात सरपंच महोत्सव साजरा करण्यात येत आहे. 

या महोत्सवात सरपंच तथा सदस्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात चंद्रपूर येथे पत्रकार परिषद घेऊन या कार्यक्रमाचे स्वरूप सांगण्यात आले. या कार्यक्रमातून गाव विकासासाठी सहकार्य करण्याचे आव्हान अध्यक्ष यांनी केले आहे. क्रीडा स्पर्धा , आरोग्य, सांस्कृतिक रक्तदान शिबिर, चालता बोलता प्रश्नमंजुषा, हळदी कुंकू कार्यक्रम, प्रगतिशील शेतकरी पुरस्कार, जिल्ह्यातील आदर्श ग्रामपंचायत, शेतकऱ्यांना मार्गदर्शन त्याचबरोबर सरपंचांना मार्गदर्शन देण्याचे या कार्यक्रमात आयोजन केले आहे. जिल्ह्यातील आमदार खासदार आणि मंत्री या कार्यक्रमाला येणार असल्याचे अध्यक्षांनी सांगितले. 

महाराष्ट्रातील होणाऱ्या या महोत्सवाला सगळ्यांनी उपस्थित राहण्याचे आव्हान आयोजन समितीने केले आहे.

Comments