शस्त्राचा धाक दाखवून प्रेमी युगुलाला लुटले

शस्त्राचा धाक दाखवून प्रेमी युगुलाला लुटले 

फक्त बातमी 

धारदार शस्त्राच्या धाकावर प्रेमी युगूलाला सहा हजार आठशे रुपयांनी लुटणाऱ्या दोन तरुणांविरुद्ध वरोरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
18 जानेवारीला सायंकाळी चार वाजता चंद्रपूर नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वरोरा येथून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या महाकाली कॉलनी जवळ ही घटना घडली होती. 

तक्रार कर्ता निखिल वय 26 हा एका फायनान्स कंपनीत कार्यरत आहे. त्याचा मित्र प्रेम च्या नातेवाईकाला फायनान्स वर दुचाकी खरेदी करायची होती. त्यामुळे प्रेमच्या बोलण्यावरून तो वरोरा येथे आला. परंतु मित्राला वाहन खरेदी करायचे नसल्याचे लक्षात आल्याने तो एका मुलीला भेटायला गेला. वरोरा शहरापासून लगत असलेल्या महाकाली कॉलनी जवळ हे दोघेही उभे राहून बोलत होते. याचवेळी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास काळ्या रंगाच्या पल्सर वर दोन युवकांनी निखिलच्या गालावर चापट मारून त्याच्या खिशातून एक हजार आठशे रुपये हिसकावले. 
यानंतर पुन्हा पैशाची मागणी करण्यात आली परंतु त्यांनी आपल्याजवळ पैसे नसल्याचे सांगितले. हे ऐकून एका तरुणाने पल्सर मध्ये ठेवलेले धारदार शस्त्र काढून निखिलच्या पोटावर ठेवले आणि पैशाची मागणी करू लागला या अनपेक्षित घटनेने निखिल आणि मुलगी खूपच घाबरले होते. पैसे नसल्यामुळे निखिल फोन नंबर देण्यास सांगितला त्यानंतर एका तरुणाने मोबाईल स्कॅनर दाखविला आणि त्यात निखिलने पाच हजार रुपये ट्रान्सफर केले. 
तिथून निघताना दोन्ही तरुणांनी कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या निखिलने वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

स्कॅनर मध्ये सुरज बालाजी गहाणे हे नाव दिसले आणि त्यांनी आपल्या सहकार्याला गोलू असे संबोधले होते. निखिलच्या या तक्रारीवरून वरोरा पोलिसांनी सुरज गोहने आणि गोलू यांच्या विरुद्ध कलम 3(5),312,351(1) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 
पुढील तपासून वरोऱ्याचे ठाणेदार अजिंक्य ताम्हडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अमोल नवघरे करीत आहे.

Comments