*रेती घाट चालू करा अन्याथा चोरीस परवानगी द्या*सामाजिक कार्यकर्ते शुभम आमने यांची उपविभागीय अधिकाऱ्यांकडे मागणी.
सामाजिक कार्यकर्ते शुभम आमने यांची उपविभागीय अधिकाऱ्यांकडे मागणी.
वरोरा :-
फक्त बातमी
वरोरा आणि भद्रावती तालुक्यात मोठया प्रमाणात रेतीची तस्करी होतांना रोज वर्तमान पत्रात दिसत आहे. रोती चोरी करून विकणाऱ्याच्या किमती देखील खूप असून या वर कोणता पर्याय काढलेला नाही. तहसील कार्यालय नेहमी रेती चे घाट लिलाव करत होते परंतु मागील वर्षापासून रेतीचा घाट लिलाव झाला नाही.त्यामुळे सर्वं सामान्य जनतेची लुट होत असून रेती नसल्यामुळे घर बांधकाम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.त्यासोबत शासनाने घरकुल दिले परंतु असून ते रेती नसल्याने अर्धवट राहिले आहे तर वरोरा भद्रावती तालुक्यातील अनेक लोकांचे घर बांधकाम थांबून आहे.तरी लवकरात लवकर निर्णय घेऊन रेतीघाट लिलाव करा अन्यथा चोरी करण्यास परवानगी द्या अशी मागणी युवा सामाजिक कार्यकर्ता शुभम शिवशंकर आमने यांनी उपविभागीय अधिकारी यांना केली आहे त्यावेळी दिनेश मोहरे ग्रामीण अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अतुल हेकाड, मयूर पिजदूरकर, विजय चिकटे, विशाल आमने, दिनेश मोडक इ.उपस्थित होते.
Comments
Post a Comment