यंदाच्या ६० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून 'शिवसेना वैद्यकीय मदत' कक्षाच्या वतीने हे संपूर्ण वर्षे 'एकनाथ हिरक आरोग्यवर्ष' म्हणून साजरे केले जाणार आहे. काल ३१ डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या रक्तदान शिबिरात या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
या उपक्रमाअंतर्गत :-
✅ ६०० लहान मुलांच्या मोफत हृदय शस्त्रक्रिया (ज्युपिटर हॉस्पिटल, ठाणे)
✅ ६०० दिव्यांग बांधवांना मोफत साहित्य वाटप (आनंद आश्रम, ठाणे)
✅ राज्यात ६० भव्य महाआरोग्य शिबिरांचे आयोजन (संपूर्ण महाराष्ट्र)
✅ ६० हजार नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी (संपूर्ण महाराष्ट्र)
✅ ६० हजार नागरिकांना मोफत चष्मे वाटप (संपूर्ण महाराष्ट्र)
✅ ६० हजार नागरिकांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया (संपूर्ण महाराष्ट्र)
✅ ६० हजार किलोमीटरची आरोग्य संवाद यात्रा (संपूर्ण महाराष्ट्र)
✅ ६० हजार वृक्ष लागवड (आंबा, चिंच, वड, पिंपळ, लिंब इ)-(संपूर्ण महाराष्ट्र)
सदर उपक्रम राबवण्यात येणार आहेत. या उपक्रमासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे आणि त्यांचे सर्व सहकारी वैद्यकीय सहाय्यक, या उपक्रमात सहभागी होणारे डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी आवर्जून उपस्थित होते.
Comments
Post a Comment