स्वप्न साकार करण्यासाठी कठोर मेहनत करावी लागते - उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम.
माढेळी: ध्येय किंवा उद्दिष्ट गाठण्यासाठी सकारात्मक स्वप्न पहावे लागतात व स्वप्न साकार करण्यासाठी कठोर मेहनत करावी लागते तेव्हाच आपले ठरविलेले उद्दिष्ट पर्यंत पोहोचणे सहज शक्य होते मी सुद्धा सातव्या वर्गात असतानाच अधिकारी बनण्याचे स्वप्न बघितले व कठोर मेहनत करून आयपीएस ची परीक्षा पास करून अधिकारी बनले असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा नयोमी साटम यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित किसान विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात 3 जानेवारीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून केले आहे. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष डोंगरगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्रीधरराव काळे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा नयोमी साटम, प्रमुख पाहुणे म्हणून संचालिका संगीता माथनकर, प्राचार्य हेमंत कावटी, पर्यवेक्षक मुकुंद घुगल हे होते. नय्यमी साटम मॅडम पुढे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी बालपणीच मुघलांना उध्वस्त करण्याचे स्वप्न पाहिले व यशस्वी केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वर्गाबाहेर काढले परंतु त्यांनी वर्गाबाहेर राहून विद्यार्जन करून आपले स्वप्न साकार केले तसेच त्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकून त्यांना त्यावेळी झालेल्या त्रासाबद्दल माहिती दिली व कठोर मेहनत व जिद्द मनात ठेवून आपले आद्य शिक्षिका बनण्याचे स्वप्न साकार केले आजच्या विद्यार्थ्यांनी मोबाईल मधील फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप आदीकडे दुर्लक्ष करून आज पासून सकारात्मक स्वप्न पाहून दहा वर्षानंतर आपल्याला अधिकारी बनायचं असं स्वप्न पहावं व कठोर मेहनत घेऊन आपले उद्दिष्ट साध्य करावे असे सांगितले यावेळी त्यांनी वेगवेगळे उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना प्रेरित केले तसेच कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी सोबत मुक्त संवाद साधून त्यांना कायदेविषयक पोक्सो कायद्याबाबत मार्गदर्शन केले यावेळी त्यांचा शाळेच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला दरम्यान विद्यार्थी व शिक्षकांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकला प्रास्ताविक प्राचार्य हेमंत कावटी तर सूत्रसंचालन अर्चना बरडे, आभार प्रदर्शन स्नेहा नैताम यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले
................................................
Comments
Post a Comment