वरोरा : येथील युवा सामाजिक कार्यकर्ते अक्षय सोनटक्के यांची भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाच्या चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अक्षय सोनटक्के सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहिलेले आहे.ते विदर्भ प्रदेश तेली समाज सेवा संघ व ऑल इंडिया बॅकवर्ड फेडरेशन या संस्थेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष आहे. तसेच ते गोल्डन ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष असून श्री स्वामी समर्थ सहकारी बँकेच्या अध्यक्षस्थानी ते विराजमान आहेत. त्यांच्याकडे वऱ्योऱ्याची राणी समितीच्या अध्यक्षपदाची देखील जबाबदारी आहे. युवा तडफदार आणि कार्यतत्पर सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
त्यांच्या या कार्याची पावती म्हणून त्यांना जिल्हाध्यक्ष उमेश बोढेकर यांनी त्यांची कामगार मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे. ते वरोरा तालुक्यातील कामगारांना नक्की न्याय देतील अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त केली जात असून त्यांच्या या नियुक्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment