भद्रावती
चेतन लुतडे
विवेकानंद महाविद्यालय, भद्रावती आणि चंद्रपूर जिल्हा बॉक्सिंग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बॉक्सिंग कौशल्य विकास शिबिर कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाला आमदार करण देवतळे उपस्थित होते. १ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी श्री अरविंद सभागृह, विवेकानंद महाविद्यालय, भद्रावती येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
उद्घाटन समारंभात प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. करणजी देवतळे, आमदार, वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र, मा. श्री. पुरूषोत्तमजी वामनराव स्वान, अध्यक्ष, विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), वरोरा, मा. श्री. राजेशजी भांडारकर, तहसिलदार, भद्रावती, मा. श्री. शिवकुमारजी पाल, आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग प्रशिक्षक, तामिडनाळू आणि मा. श्री. डॉ. एन. जी. उमाटे, प्राचार्य, विवेकानंद महाविद्यालय, भद्रावती यांचा समावेश होता.
बॉक्सिंगच्या या महत्त्वपूर्ण टप्प्यावर प्रशिक्षक आणि खेळाडूंसाठी उत्कृष्ट मार्गदर्शनाची संधी प्रदान केली गेली.
Comments
Post a Comment