*कार्यालयातूनच पक्षाच्या कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळते: आमदार करण देवतळे*

*कार्यालयातूनच पक्षाच्या कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळते: आमदार करण देवतळे*
 *भाजप कार्यालयाच्या वर्षपूर्ती सोहळ्यात प्रतिपादन*
*वर्षपूर्ती सोहळ्या त जेष्ठ कार्यकर्त्यांचा केला सत्कार.*

 वरोडा : शाम ठेगडी

         वरोरा येथील सुयोग  हॉस्पिटल मध्ये असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाच्या वर्षपूर्ती निमित्त  आयोजित कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाच्या उभारणीत सक्रिय योगदान देणाऱ्या जुन्या पिढीतील कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.
     वरोडा भद्रावती विधानसभा  क्षेत्राचे प्रमुख रमेश राजूरकर यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला चंद्रपूरचे उद्योजक व ज्येष्ठ भाजप नेते रमेशजी बागला, नवनिर्वाचित आमदार करण देवतळे, डॉ. सागर वझे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
      भाजपच्या तालुका कार्यालयाच्या वर्षपूर्ती निमित्य आयोजित या कार्यक्रमात जनसंघापासून पक्षाचे निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या रमेशजी बागला, भद्रावतीचे चंद्रकांत गुंडावार, अशोक हजारे, माढेळीचे चंद्रकांत केशवराव बोरीकर, वरोड्याचे सुभाष उर्फ बाबा भागडे, डॉ.भगवान गायकवाड व गोपाल वर्मा, शेगावचे राजू बच्चूवार या कार्यकर्त्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
    पक्षाच्या कार्यालयातून कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळते.या ऊर्जेच्या भरोशावरच कार्यकर्ता अधिक सक्रियतेने काम करतो. कार्यकर्ता हा पक्षाचा आत्मा आहे. कार्यकर्त्याच्या कामामुळेच पक्षाला बळकटी मिळते. अशा कार्यकर्त्यांच्या  परिश्रमामुळेच आपला विजय झाला असून  आपला विजय हे कार्यकर्त्यांच्या यशाचे फलित आहे असे मत याप्रसंगी आमदार करण देवतळे यांनी व्यक्त केले. 
      भाजपची झालेली वाढ ही जुन्या कार्यकर्त्यांनी निस्वार्थपणे घेतलेल्या मेहनतीचे फळ आहे. त्यामुळेच पक्षाला आजची स्थिती प्राप्त झाली असल्याचे उद्गार याप्रसंगी रमेश राजूरकर यांनी व्यक्त केले.
जुन्या पिढीतील कार्यकर्त्यांनी  पक्ष कार्य करताना विचाराला विरोध केला पण व्यक्तीला नाही. राजकारणात हे होणे आवश्यक आहे.यामुळे अपयश येऊ शकेल पण कार्य  महत्त्वाचे आहे. पक्षासाठी आपले सर्वस्व देणारे कार्यकर्ते पक्षाला मिळाले म्हणूनच पक्ष मोठा झाला आणि त्यामुळेच वरोडा भद्रावती विधानसभा क्षेत्रातून पक्षाचा आमदार निवडून आला आहे असे मत  रमेशजी बागला यांनी यावेळेस बोलताना व्यक्त केले.
        पक्ष कार्य व पक्ष वाढीसाठी या कार्यालयातून सतत प्रयत्न  केले जाईल. आपण असो अगर नसो परंतु या ठिकाणी हे कार्यालय नेहमीसाठी राहील अशी ग्वाही याप्रसंगी डॉक्टर सागर वझे यांनी आपल्या प्रास्ताविकातून दिली.
      भाजपाचे प्रथम दिवंगत पंतप्रधान आदरणीय अटल बिहारी बाजपेयी यांच्या  प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. डॉक्टर सागर वझे यांनी प्रास्ताविक तर श्याम ठेंगडी यांनी पाहुण्यांचा व जुन्या पिढीतील कार्यकर्त्यांचा परिचय करून दिला. विलास कावलकर यांनी कार्यक्रमाचे संचलन केले. या कार्यक्रमाला सुवर्णरेखा पाटील, सुनील वारेकर,विवेक डंभारे यांचे सह भाजपचे अनेक महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments