आनंदवनात 'योग आणि आयुर्वेद' या विषयावर राष्ट्रीय परिषद व गुरुस्मरण.

आनंदवनात 'योग आणि आयुर्वेद' या विषयावर राष्ट्रीय परिषद व गुरुस्मरण.

वरोरा: महारोगी सेवा समिती संचालित आनंद निकेतन महाविद्यालय, धन्वंतरी आयुर्वेद संशोधन संस्था, धुळे, चंद्रपूर जिल्हा आयुर्वेद समिती, नॅशनल इंटिग्रिटेड मेडिकल असोसिएशन, वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ४ व ५ जानेवारी २०२५ ला गुरुवार्य वैद्य प्र. त. जोशी यांच्या जयंती निमित्त व श्रद्धेय बाबा व साधनाताई आमटे यांनी सुरु केलेल्या समाजकार्याला - महारोगी सेवा समिती, वरोरा ला यावर्षी ७५ वर्ष पूर्ण होत आहे हे दोन्ही औचित्य साधून गुरुस्मरण व ‘योग आणि आयुर्वेद' या विषयावर राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद आनंदवन, वरोरा येथे होणार आहे. गुरुस्मरण व राष्ट्रीय परिषदेत संपूर्ण देशभरातील १८ राज्यांमधून ६०० व अधिक सहभागी उपस्थित राहणार असून, योगतज्ञ, आयुर्वेदतज्ञ, संशोधनकर्ते, वैद्य, शिक्षक, विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांना एकत्र आणून योग आणि आयुर्वेद क्षेत्रातील नवकल्पना, आयुर्वेद औषधनिर्माण, पंचकर्म व षटकर्म अश्या विषयांच्या संशोधन आणि प्रगतीवर चर्चा करण्यात येणार असून शोध निबंध सादर करण्यात येईल. तसेच उद्योग,आणि संशोधन क्षेत्रातील शास्त्रज्ञ, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञ, व्यावसायिक आणि नामांकित वक्त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे या परिषदेचे उद्दिष्ट आहे.

सहभागींच्या परस्पर चर्चेतून विचारांची देवाणघेवाण होऊन योग आणि आयुर्वेद क्षेत्रातील नवीन दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होईल. गुरुस्मरण व परिषदेचा उद्घाटन समारंभ महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे, वैद्य नरेंद्र गुजराथी, वैद्य प्रवीण जोशी, सौ पल्लवी कौस्तुभ आमटे , आनंद निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे, कैवल्यधाम लोणावळा योग संस्थान चे संचालक डॉ. मन्मथ घरोटे आदींच्या उपस्थितीत ४ जानेवारी २०२५ ला संपन्न होईल.
यशस्वी आयोजनाकरिता  नॅशनल इंटिग्रिटेड मेडिकल असोसिएशन, वरोरा , आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन , धन्वंतरी आयुर्वेद शिक्षण संशोधन संस्था, धुळे, चंद्रपूर आयुर्वेद परिवारातील सर्व सदस्य कार्य करीत आहे.

Comments