फैल परिसरातील नागरिक संतप्त.
वरोरा
चेतन लूतडे
वरोरा : तिसऱ्या रेल्वे लाईनच्या कामामुळे बोर्डा व आनंदवन चौकातून वरोरा शहरात जाणाऱ्या दोन्ही मार्गावरील वाहतूक रेल्वे विभागाने बंद केली. मात्र, बंद बोगद्याच्या वरील रेल्वे रुळावरून नागरिक धोकादायक प्रवास करीत आहेत. अशातच रेल्वे रूळ ओलांडण्याच्या प्रयत्नात एका महिलेचा शिवाजी चौकातील रेल्वे रुळावर तर दुसऱ्या महिलेचा उड्डाण पुलानंतर बंद करण्यात आलेल्या एकार्जुना रेल्वे गेट रुळावर रेल्वेची धडक बसल्याने मृत्यू झाला. या घटना १४ फेब्रुवारीला दुपारच्या सुमारास घडल्या.
नागपूर-चेन्नई तिसऱ्या रेल्वे लाईनच्या कामासाठी पूल वजा बोगद्यांचे रुंदीकरण सुरू असल्याने ७ जानेवारीपासून बोर्डा चौकातील तर १० फेब्रुवारीपासून सरदार पटेल वॉर्डातील बोगदा रेल्वे विभागाने बंद केला आहे. अलीकडेच बारावीची परीक्षा सुरू झाली आहे. 20 फरवरी पासून दहावीची परीक्षा सुरू होत आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून हे दोन्हीही मार्ग अति महत्त्वाचे आहे. नागपूरकडे आणि चिमूर कडे जाण्यासाठी हाच मार्ग आहे. मार्ग बंद झाल्यास पाच ते सहा किलोमीटरचा फेरा नागरिकांना घालावा लागतो.
त्यामुळे हा मार्ग रेल्वेने बंद केल्याने रेल्वे रुळावरून धोकादायक अवस्थेत मार्गक्रमण करावा लागत आहे.
एका बाजूला तारेचे वॉल कंपाऊंड नसल्याने विद्यार्थी नागरिक मोठ्या प्रमाणात ये-जा करीत असतात. या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने कोणतीही सूचना फलक लावले नाही. किंवा कोणताही सुरक्षा कर्मचारी तैनात केलेल्या नाही. आणि काम सुद्धा सुरू झालेले नाही. त्यामुळे अनिश्चित काळासठी रेल्वेने हा मार्ग बंद केल्याने दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. एका महिलेची ओळख पटली असून दुसऱ्या महिलेची ओळख पटलेली नाही.
या सगळ्या घटनेमुळे खांजी वर्गातील नागरिकांचा रोष वाढलेला असून येण्या जाण्यासाठी लावलेल्या टीना काढण्यात आल्या. व रेल्वे प्रशासनाला जोपर्यंत हे काम सुरू होत नाही तोपर्यंत पूल बंद करू नये अशी मागणी केली आहे.
या ठिकाणी वाढीव पुलाचे तिरके मोजमाप झाल्याचे दिसून आले. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. येणाऱ्या पावसाळ्याच्या दिवसात पाणी थांबून फैल परिसरात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या समस्येचा विचार रेल्वे प्रशासनांनी करावा अशी शुद्ध मागणी नागरिकांकडून होत आहे.
Comments
Post a Comment