बोर्डा ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभारठराव न करताच सचिवाने, सरपंचाने दिले नाहरकत प्रमाणपत्र

बोर्डा ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार

ठराव न करताच सचिवाने, सरपंचाने दिले नाहरकत प्रमाणपत्र

फक्त बातमी 

वरोरा : वरोरा शहरालगत असलेली बोर्डा ग्रामपंचायत तालुक्यात सर्वांत मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाते. काही दिवसापूर्वी २३ जानेवारीला झालेल्या मासिक सभेत सर्व सदस्यांच्या उपस्थितीत मासिक सभा पार पडली. या सभेत खांजी येथील सर्वे क्रमांक २४५ या जमिनीचे एकूण क्षेत्रफळापैकी २.६८ हेक्टर आर. जमीन अकृषक करण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्रासाठी ले-आउट धारकांनी ग्रामपंचायत बोर्ड येथे अर्ज केला होता. मात्र, मासिक सभेत अर्जाचे वाचन न करताच ग्रामविकास अधिकाऱ्याने सरपंच्यांना हाताशी घेवून लेआउट धारकांना परस्पर ना हरकत प्रमाणपत्र देण्याची बाब उघडकीस आली.

या सभेमध्ये ठराव पुस्तिकेत कोणत्याही सदस्यांच्या सह्या नाही. ठराव मंजूर नसताना सुद्धा लेआउट धारकांना, ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे. सदर बाब ग्रामपंचायत सदस्यांच्या लक्षात येताच याबाबत उपस्थित आठही सदस्यांनी स्वाक्षरीसह जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे तक्रार केली. या संदर्भात सदस्यांशी संपर्क साधला असता अशा प्रकारचा कोणताही अर्ज सदर सभेत वाचण्यात आलेला नाही किंवा त्यावर चर्चा सुद्धा झालेली नाही, असे म्हटले. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य उमेश देशमुख यांनी १० फेब्रुवारीला ग्रामविकास अधिकाऱ्याकडे झालेल्या सभेची प्रोसिडिंगची साक्षांकित केलेली सत्यप्रत मिळण्याबाबत रीतसर अर्ज केला. परंतु, ग्राम विकास अधिकारी सुभाष ताजने यांनी प्रोसिडिंगवर सदस्यांच्या सध्या सह्या नसल्यामुळे सत्यप्रत देऊ शकत नाही, असे सांगून टाळाटाळ केली जात आहे.

Comments