*शिवजयंती निमित्ताने किल्ला स्वच्छता अभियान**इको-प्रोसह राजीव गांधी अभियांत्रिकी, समाजकार्य महाविद्यालय व सारथी इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचा सहभाग*
*इको-प्रोसह राजीव गांधी अभियांत्रिकी, समाजकार्य महाविद्यालय व सारथी इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचा सहभाग*
अंकुश अवथे चंद्रपूर
चंद्रपूर: इको-प्रो संस्थेच्या माध्यमाने शिवजयंती निमित्ताने चंद्रपूर जिल्हा परकोट स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली. आज बगड खिडकी ते अंचलेश्वर गेट पर्यंतच्या हेरिटेज वॉकच्या मार्गाची स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले. आज स्थानिक राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय, डॉ सुशिलाबाई रामचंद्र मामीडवार समाजकार्य महाविद्यालय व सारथी इन्स्टिट्यूट च्या विद्यार्थ्यांनी श्रमदानात सहभाग घेतला.
या अभियानात महाविद्यालयीन विद्यार्थी व अन्य युवकांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. लवकरच बगड खिडकी ते अंचलेश्वर गेट पर्यंतच्या हेरिटेज वॉक म्हणजे चंद्रपूर किल्ला व ऐतिहासिक वास्तू पर्यटनाला सुरुवात करण्यात येईल. यापूर्वी इको-प्रो ने चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियान सलगएक हजार वीस दिवस नियमित राबविले तसेच चंद्रपूर पर्यटनास चालना मिळावी म्हणून किल्ला पर्यटन सुरू केले होते. आज हेरिटेज वॉक मार्गातील स्वच्छता करण्यात आली, बुरुज 4 व त्याचा परिसर स्वच्छ करण्यात आला.
स्वच्छता अभियान नंतर शिवजयंती निमित्त छोटा कार्यक्रम घेण्यात आला. आपला स्थानिक ऐतिहासिक वारसा आणि युवकांची भूमिका, शिवाजी महाराजांचे खरे स्मारक असलेले गडकिल्ले त्यांचे महत्व आणि संरक्षण-संवर्धनाची गरज, गोंडकालीन इतिहासाविषयी आणि किल्ला संवर्धनासाठी सुरू असलेले प्रयत्न याविषयी इको-प्रो चे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी माहिती दिली. या अभियानात प्रा. प्रमोद सहारे, संस्थेचे अध्यक्ष बंडु धोतरे, सुमित कोहळे, अभय अमृतकर, कुणाल देवगिरकर, राजू काहिलकर, मनीष गावंडे, सचिन धोतरे, मोरेश्वर मडावी, रुद्राक्ष धोतरे तर भाविक गोरे, रोहित सत्यपाल, गणेश दाढे, पूजा देऊलकर, गौरी कोहपरे, वैभवी रंगनकर, आकाश नागोलकर, कोमल घोडे, संकेत झाडे व अन्य विद्यार्थी सहभागी होते.
Comments
Post a Comment