*मुख्यमंत्र्यांविरोधात शेतकऱ्यांनी केली तक्रार** *मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्या, अन्यथा आंदोलन*
*मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्या, अन्यथा आंदोलन*
वरोडा: शाम ठेंगडी
वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज 20 फरवरी रोज गुरुवारला त्यांच्या विविध समस्याबाबत मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री यांनी आपली फसवणूक केल्याची तक्रार वरोड्याचे तहसीलदार व पुलिस स्टेशन मध्ये केली. आपल्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास पुढील महिन्यात चंद्रपूर नागपूर महामार्ग रोखून धरण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री यांनी निवडणुकीपूर्वी शेतकरी यांना प्रलोभन देऊन मते मागितली.तसेच डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना कमीत कमी एक महिना व जास्तीत जास्त सहा महिन्यापर्यंत विद्युत जोडणी करणे बंधनकारक असताना पाच ते सहा वर्ष लोटून सुद्धा विद्युत जोडणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांना अडचणीचे होत असून त्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री आणि जिल्हाचे पालकमंत्री यांच्या विरोधात वरोड्याचे तहसीलदार योगेश कौटकर यांच्याकडे निवेदन दिले.
. शेतकरी नेते किशोर डुकरे यांच्या नेतृत्वामध्ये निवेदन देऊन त्वरित समस्या सोडविण्यात यावा अन्यथा येथील 10 मार्च ला नागपूर चंद्रपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केल्या जाईल. असा इशारा दिला असून याला जबाबदार प्रशासन राहील असे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या मागण्याचे निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात अक्षय बोंदुलवार, विशाल देठे, श्रीकृष्ण देवतळे , माधव जीवतोडे, गोविंदा पाकमोडे, अंकित देठे, आकाश धवणे, सुनील चिडे, बालू आवारी, नितीन मोरे, प्रेमानंद सूर आधी शेतकऱ्यांचा समावेश होता.
Comments
Post a Comment