वरोरा
फक्त बातमी
वरोरा शहरातील नेहरू चौक परिसरातील बिअर बारसमोर काचेची बॉटल फोडून पोटात खुपसल्याने एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना २४ फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली.
वरोरा येथील नेहरू चौक परिसरातील एका बिअर बारसमोर दोन युवकांमध्ये भांडण झाले. या भांडणात ओमप्रकाश नामदेव रघाताटे (३४, रा. चिरघर ले-आउट) याने शीतपेयाची काचेची बॉटल फोडून अमोल मनोज गज्जलावार (२०, रा. यात्रा वॉर्ड) याच्या पोटात खुपसली. यात अमोल गंभीर जखमी झाला.
तर, दोघांच्या झटपटीत बॉटल ओमप्रकाश रघाताटे याच्या हाताला लागल्याने तोही जखमी झाला. घटनेनंतर दोन्ही जखमींना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, अमोलची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. या प्रकरणाची पोलिसांनी दखल घेतली असून, त्यांच्या देखरेखीखाली आरोपीवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Comments
Post a Comment