‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे पॉझिटिव्ह जर्नालिझम पुरस्कार जाहीर दिलीप वैद्य, सूरज कदम, संदीप खडेकर, बाळासो पाटील, वृषाली पाटील पुरस्काराचे मानकरी
‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे पॉझिटिव्ह जर्नालिझम पुरस्कार जाहीर
दिलीप वैद्य, सूरज कदम, संदीप खडेकर, बाळासो पाटील, वृषाली पाटील पुरस्काराचे मानकरी
मुंबई (प्रतिनिधी) : सकारात्मक बातमीदारी करून पत्रकारितेवरचा विश्वास कायम असावा, यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड सुरू केले असून, यावर्षी पत्रकार दिलीप वैद्य, सूरज कदम, संदीप खडेकर, बाळासो पाटील, वृषाली पाटील हे ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड २०२४ पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
पत्रकार आणि पत्रकारिता यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने दमदार वाटचाल केली आहे. पत्रकारांसाठी पंचसूत्री घेऊन महाराष्ट्र राज्यापासून सुरू झालेला संघटनेचा प्रवास जगभरात 52 देशांपर्यंत गेला आहे. पंचसूत्रीप्रमाणे ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड सुरू केले. या स्पर्धेमुळे गेल्या वर्षभरात १ लाख ३२ हजार सकारात्मक बातम्या लिहिल्या गेल्या. पत्रकार आणि पत्रकारितेसाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने पुढाकार घेतला. ही स्पर्धा सकारात्मक पत्रकारितेसाठी होती. ज्यातून पत्रकारितेची मूल्य समाज मनात रुजावी, हा उद्देश होता. यावर्षी या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या दोन हजार चारशे पत्रकारांचे मनापासून अभिनंदन करावे लागेल. या सर्व सहभागी पत्रकारांमधून दिलीप वैद्य- जळगाव, सूरज कदम - परभणी, संदीप खडेकर- यवतमाळ, बाळासो पाटील- कोल्हापूर, वृषाली पाटील- मुंबई यांची निवड झाली आहे.
पत्रकारिता क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींची निवड करण्यासाठी निवड समितीमध्ये प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, सरचिटणीस दिगंबर महाले, कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर, विजय चोरडिया, मंगेश खाटीक, उपाध्यक्ष अजितदादा कुंकूलोळ यांचा समावेश होता. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या वतीने सर्व विजेता प्राप्त पत्रकारांचे अभिनंदन होत आहे. राज्य शासन आणि ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या वतीने देण्यात येणारे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार व्यंकटेश जोशी, वैभव वानखडे, सीमा सिंग, डॉ. विजय दहिफळे, शिवाजी बनकर यांना घोषित झाले असून ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड २०२४’ आणि ‘महाराष्ट्र भूषण’हे दोन्ही पुरस्कार मान्यवर व्यक्तींच्या हस्ते मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये येत्या २३ फेब्रुवारीला देण्यात येणार आहेत.
.........
Comments
Post a Comment