*आनंदवन येथे मित्रांचा कृतज्ञता मेळावा साजरा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. *कार्पोस फंड दहा कोटी देण्याचे आश्वासन. *रुग्णालय व पुनर्वसन अनुदानात वाढ.

*आनंदवन येथे मित्रांचा कृतज्ञता मेळावा साजरा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. 
*कार्पोस फंड दहा कोटी देण्याचे आश्वासन. 
*रुग्णालय व पुनर्वसन अनुदानात वाढ.

वरोरा 9/2/2025
चेतन लूतडे 

श्रद्धेय बाबा आमटे यांनी सुरू केलेल्या महारोगी सेवा समिती आनंदवन  प्रकल्पाला 75 वर्षे पूर्ण झाली असून मित्र परिवारातर्फे दोन दिवसीय कृतज्ञता सोहळा मुख्यमंत्री हॉल आनंदवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी उद्योगमंत्री उदय सावंत, आदिवासी कल्याण मंत्री अशोक उईके , स्थानिक आमदार आणि आमटे परिवारसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांचे स्वागत करताना शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन मत्ते

यावेळी अध्यक्ष भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंदवनच्या वाटचालीची प्रशंशा करत. 75 वर्षानंतर लोकांचा आनंदवनकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. हे कार्य अत्यंत कठीण होते. आनंदवन हे प्रयोगवन असून, सकारात्मक काम करून समाजामध्ये संवेदना निर्माण करण्याचे काम आमटे परिवारांनी केले आहे.
सरकारच्या योजना बदलत असतात या बदलत्या प्रवाहात विचलित न होता या संस्थेने विविध क्षेत्रात काम करत लोकांना जुळवत सामाजिक बांधिलकीचे काम केले आहे. त्यामुळे अशा संस्थांना बळकटी देण्यासाठी आमचे शासन कटिबद्ध राहील अशी ग्वाही देत. 10 कोटी रुपयाचे कार्पोस फंड देण्याचे आश्वासन दिले. याचबरोबर रुग्णालय व पुनर्वसन अनुदानात 2000 वरून 6000 रुपये वाढ करण्यात येणार आहे.
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्किल डेव्हलपमेंट सेंटर उभारून आनंदवन बळकटी देण्याचे काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2027 पर्यंत देश कुष्ठरोग मुक्त करण्याचे आव्हान केले असून त्या दृष्टिकोनातून देशभरात पाऊल उचलले जात आहे.
बाबा आमटे यांनी सुरू केलेल्या जगन्नाथाच्या रथाला अनेकांचे हात लागले आहे. अजूनही लागतील ,विविध माध्यमाच्या मदतीने आनंदवनला मदत करून आर्थिक दृष्ट्या बळकट करण्याचे मानस त्यांनी व्यक्त केला. 
आमटे परिवारा तर्फे नवीन पिढीत जुळलेल्या कौस्तुभ
, दिगंत आमटे यांना शुभेच्छा व्यक्त करीत महाराष्ट्र शासनाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

आनंदवनच्या नवीन उभारणीसाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भरीव मदत करण्याचे आश्वासन सामंत यांनी दिले. वेगवेगळ्या योजनांचा शुभारंभ मुख्यमंत्री आणि उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. आनंदवन सारखे 2%  काम महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात केल्यास बाबा आमटे यांना खरी श्रद्धांजली असेल असे मत उद्योग मंत्री सामंत यांनी व्यक्त केले.

बाबा आमटे यांच्या जीवनपटावर आधारित चित्रपट निर्मिती करण्याचे ठरले असल्याची मत  जोशी यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रमुख पाहुणे उद्योग मंत्री उदय सामंत , आदिवासी कल्याण मंत्री अशोक ऊईके, आमदार करण देवतळे,आ‌.किशोर जोरगेवार, संजीव रेड्डी बोत्कुलवार हेमंत पांडे, राम नाईक, सुहास तुळजापूरकर, श्रीमान रानडे, प्रकाश आमटे, विकास आमटे आनंदवन येथील रहिवासी आमंत्रित पाहुणे यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

विविध योजनेचे ऑनलाईन उद्घाटन 

बाबा आमटे जीवनापट मराठी आणि इंग्रजीमध्ये भाषेवर आधारीत चित्रपटाचे पोस्टर ऑनलाईन पध्दतीने मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. एस्ट्याब्लिशींग एम.एम.एस. (महारोगी सेवा समिती) अॅज हेल्थ कॅपिटल,  आनंदवनला डब्ल्यूसीएल कडून मिळालेल्या सोलर पॉवर जनरेशन प्रोजेक्ट, एस्ट्याब्लिशींग एम.एम.एस. अॅज स्कील डेव्हलपमेंट कॅपिटल आदींचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले.

Comments