*100 दिवस कृती आराखड्याअंतर्गत मुधोली येथे विशेष शिबीर* *नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ*

*100 दिवस कृती आराखड्याअंतर्गत मुधोली येथे विशेष शिबीर*
 *नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ*

चंद्रपूर, दि. 2 मार्च : राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्हा प्रशासनाद्वारे 100 दिवसांचा कृती आराखडा राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने भद्रावती तालुक्यातील मुधोली येथे विशेष शिबीर घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहायक जिल्हाधिकारी तथा वरोराचे उपविभागीय अधिकारी झेनीथ चंद्र दोन्तुला होते.
     यावेळी महसूल विभागांतर्गत उत्पन्नाचे दाखले, अल्पभूधारक दाखले, जात प्रमाणपत्र, रेशन कार्ड वितरित करून लाभ देण्यात आला. ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड झाले नव्हते त्यांची आधार कार्ड नोंदणी करण्यात आली तसेच काही लाभार्थ्यांचे केवायसी करून देण्यात आले. कृषी विभागातर्फे विविध योजनांचा लाभ देण्यात आला. सहाय्यक  निबंधक सहकारी संस्था यांच्याकडून पीक कर्जाचे फॉर्म भरून घेण्यात आले तसेच सदस्य नोंदणी करण्यात आली.    दुय्यम निबंधक नोंदणी व मुद्रा विभाग यांच्यकडून बक्षीस पत्राकरिता माफक दरात मुद्रांक शुल्क भरून शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला. वन्य प्राण्यांमुळे झालेल्या हानीकरिता लाभार्थ्यांना वन विभागाकडून लाभ मिळवून देण्यात आला.
  उपधीक्षक भूमि अभिलेख यांच्याकडून स्वामित्व योजनेअंतर्गत सनद वाटप करण्यात आले. तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात आला. तालुका ग्रामीण रुग्णालयातर्फे शेतकऱ्यांना स्वास्थ तपासणीचा लाभ उपलब्ध करून देण्यात आला. त्यामध्ये क्षयरोग दूरीकरण, हत्तीरोग तपासणी व गोळ्या वाटप, कर्करोग तपासणी, क्षयरोग तपासणी, सिकल सेल निर्मूलन अभियान, बीपी, शुगर तपासणी इत्यादी लाभ देण्यात आला.  पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग अंतर्गत स्वच्छ भारत मिशन अभियानाबाबत माहिती देण्यात आली.      
०००००

Comments