लोकमान्य महाविद्यालयात मराठी भाषा दिन संपन्न*

*लोकमान्य महाविद्यालयात मराठी भाषा दिन संपन्न* 
वरोडा : श्याम ठेंगडी 

            येथील लोकमान्य महाविद्यालयात मराठी विभाग आणि भाषा भारती द्वारा कुसुमाग्रज यांची जयंती व मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी “ओंकार साधना आणि उच्चारशास्त्र” या विषयावर २७ फरवरी रोज गुरुवारला एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. 
      या कार्यशाळेचे पहिले सत्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आणि दुसरे सत्र माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी होते. या कार्यशाळेकरिता मार्गदर्शक म्हणून लोकमान्य महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जयश्री शास्त्री उपस्थित होत्या. या कार्यशाळेत ओंकार साधना कशी करावी मराठी वर्णमालेतील विविध वर्णांचे योग्य उच्चार कसे करावे आणि त्यामध्ये सहजता येण्यासाठी उपयुक्त तंत्राचा उपयोग कसा करावा याचे प्रात्यक्षिक प्राचार्यानी करून दाखविले आणि विद्यार्थ्यांकडून तसा सरावही करून घेतला. भाषा समृद्धीसाठी उच्चार शास्त्र हेही कसे महत्त्वाचे आहे हे त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनातून सोदाहरण स्पष्ट केले. सहभागी विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा बोध घेतला. या कार्यशाळेला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद उपस्थित होते. मार्गदर्शक डॉ. जयश्री शास्त्री यांचे स्वागत प्रा. चेतना पवार यांनी केले.
      कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रजनीगंधा खिरटकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अर्चना भोगेकर यांनी केले तर आभार प्रा. मेघा लाकडे यांनी मानले. कार्यशाळेचा प्रारंभ मराठी भाषा गौरवगीताने आणि  समारोप सामुदायिक पसायदानाने करण्यात आला. 

.           लोकार्पण सोहळा, भटाळी, भद्रावती 

सप्त खंजेरी वादक श्री सत्यपाल महाराज यांचे कीर्तन 

.  छावा चित्रपट पाहण्यासाठी आमदाराची उपस्थिती.

Comments