भटाळी ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामाचे लोकार्पण सोहळा व सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांच्या कीर्तनात ग्रामगीतेचे पुस्तके वाटप.
सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांच्या कीर्तनात ग्रामगीतेचे पुस्तके वाटप.
अपंग गरजू महिलांना तीन चाकी सायकल वाटप.
वरोरा १/३/२०२५
चेतन लूतडे
जाहिरात
भद्रावती तालुक्यातील भटाळी ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामाचे लोकार्पण सोहळा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा , वरोरा भद्रावती विधानसभेचे आमदार करण देवतळे , उपविभागीय अधिकारी झेनित चंद्रा यांच्या हस्ते पार पडला.
दोन दिवशी कार्यक्रमांमध्ये भटाळी गावामध्ये ग्रामस्वच्छता अभियान राबवून गाव स्वच्छ करण्यात आले. हळदी कुंकू कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष नीलिमाताई रोहनकर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून नवोमी साटम, कार्यक्रमाचे मार्गदर्शक डॉक्टर अश्विनी गेडाम, डॉक्टर देवयानी ताजने यांच्या उपस्थितीत महिला मेळावा पार पडला. यामध्ये महिला सक्षमीकरणावर प्रबोधन करण्यात आले.
शुक्रवारी दुसऱ्या दिवशी पार पडलेल्या कार्यक्रमादरम्यान उद्घाटक आमदार करण देवतळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश राजुरकर, जिल्हाधिकारी विनय गौडा, चंद्रकांत वासाडे, राष्ट्रवादीचे नेते विलास नेरकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. भटाळी सरपंच रोहनकर यांच्या संकल्पनेतून झालेल्या आरो प्लांट चे उद्घाटन आमदार करण देवतळे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर शिव मंदिर परिसरातील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या घरकुलाचे व सहकार सेवा संस्थाच्या इमारतीचे उद्घाटन जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते करण्यात आले. भटाळी गावामध्ये ग्रामस्वच्छता अभियानाचे प्रतीक म्हणून झाडू हाती देऊन जिल्हाधिकारी व आमदार यांचे पारंपारिक पद्धतीने औक्षवंत करून स्वागत करीत दिंडी काढण्यात आली. भटाळी गावामध्ये तुकडोजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करून मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकारी गौडा यांनी समाज भवन देण्यासाठी यामध्ये आमदार साहेबांनी मदत करावी अशी इच्छा व्यक्त केली. भटाळी गावात झालेल्या विकास कामांची स्तुती आमदार देवतळे यांनी व्यक्त करीत गावाला मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गावातील गरजू महिलांना तीन चाकी सायकल वाटप करण्यात आली.
शुक्रवारी रात्री झालेल्या सप्त खंजेरी वादक सत्यपाल महाराज यांच्या कार्यक्रमामुळे गावांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून ग्रामगीतेचा प्रचार मोठ्या प्रमाणात करण्यात आला. यावेळी गावागावातून आलेल्या शेतकरी , महिला, युवकांनी कार्यक्रम पाहण्यासाठी अलोट गर्दी केली होती.
दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत भटाळी व गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने सरपंच सुधाकर रोहनकर यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये तहसीलदार राजेश भांडारकर, संद्या चिवंडे अधीक्षक महावितरण कंपनी चंद्रपूर, पंचायत समिती पारखी साहेब, उद्योजक चंद्रकांत वासाडे, राजेंद्र ताजने, भास्कर तुमराम, प के मनोहर, सरपंच मंगेश भोयर, सरपंच शंकर रासेकर सरपंच, मोहित लाभाने, सरपंच, स्वप्नील पंतवाने, सरपंच मनीषा रोडे, सरपंच मनीषा तुरंकार सरपंच, धनराज पायघन, सुरेश ताराळे,एकनाथ घागी, सरपंच,दिवाकर नांनावरे, मुना व्ही वर्मा साहेब,सेवा सहकारी संस्था सचिव चिडे साहेब, ग्रामपंचायत सचिव प्रणिता ठक,विलास सातपुते, भाग्यश्री हिरादेवे, श्रीराम मंडळाचे सर्व कार्यकर्ते, गुरुदेव सेवा मंडळाचे सर्व कार्यकर्ते गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment